हल्ली सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ अधिक व्हायरल होताना दिसतात. कधी पाळीव प्राण्यांचे गोंडस व्हिडीओ, तर कधी जंगलातील प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळता. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचं चांगलं मनोरंजन होतं. हे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात. सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. जंगलातील एकूण एक प्राणी या सिंहाला घाबरून राहतात. या जंगलाच्या राजाला तुम्ही कधी मस्ती करताना पाहिलंय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुम्ही कामावरून थकून परत आला असाल, तर आमच्याकडे सिंह आणि त्याच्या छाव्यांचा गोंडस व्हिडीओ आहे जो तुम्हाला नक्कीच हसवेल. हा व्हिडीओ पाहताना तुमच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सिंह जंगलाच्या वाटेवरून चालताना दिसत आहे. या सिंहाच्या मागे काही गोंडस पिल्ले सुद्धा येताना दिसतात. ही गोंडस पिल्लं आपल्या वडिलांसोबत चालण्याचा खूप प्रयत्न करतात आणि पण त्यांचे इवले इवलेसे पाय वाटेत अडखळतात. 

छावे आपल्या वडिलांच्या पावलांवर लक्ष ठेवून आहेत. जिथं जिथं वडील जातील तिथं तिथं ही पिल्लं त्याच्या मागेमागे लुटूलुटू जातात. अशातच सिंहाने आपल्या इटुकल्या छाव्यांसोबत एक गंमत करण्याचं ठरवली. छावे आपल्या वडिलांच्या मागे मागे येताना अचानक ते अडखळतात. हे पाहून सिंह सुद्धा त्यांची नजर चुकवत त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पिल्लांना सोडून जाण्याचा प्रयत्न करतो. जंगलाच्या मध्येच तो आपल्या पिल्लांना एकटं टाकून तिथू पळतो सुद्धा. पण शेवटी ते सिंहाचेच छावे आहेत. ते सुद्धा काही सिंहाला असंतसं जाऊ देत नाहीत. ते सुद्धा आपल्या छोट्याशा पावलांनी धाव घेतात आणि आपल्यापासून दूर पळणाऱ्या आपल्या वडिलांचा पाठलाग करतात. आपल्या वडीलांच्या पाठीमागे धावत जातात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : हॅलोविनच्या दिवशी मुलांसाठी कँडी शूट करण्यासाठी चक्क सेनेचा HIMARS रॉकेट वापरला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : रस्त्याच्या मधोमध बसून सिंहांनी मस्ती सुरू केली, वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या

हा व्हिडीओ ट्विटरवर TansuYegen नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर ्व्हायरल देखील झाला. लोकांना हा व्हिडीओ फार आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत २.३ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This lion walking with its cubs is too cute to miss viral video has over 2 million views prp