लहान मुलं सगळ्यांनाच आवडतात. विशेषतः त्यांचा खोडकर स्वभाव. लहान मुलं इतकी निरागस असतात की त्यांच्या निरागसतेने ती आपली मनं जिंकतात. परंतु कधी कधी त्यांच्यातील सुप्त गुण दाखवून ते आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात तीन लहान मुलांनी त्यांच्यातील गुणांचा परिचय करून दिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्या मुलांचे कौतुक कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तीन लहान मुलं गाणं गात आहेत. यातील एका मुलाने आपल्या हातात एक काठी पकडली आहे. तिला तो गिटारप्रमाणे वाजवत आहे. तर बाजूला उभी असलेली दोन मुलं देखील गिटार वाजवण्याचा अभिनय करत आहेत. मध्ये उभा असलेला मुलगा अगदी तल्लीन होऊन एखाद्या प्रोफेशनल सिंगर असल्याप्रमाणे गाणं गात आहे.

वडिलांनी मुलांसाठी तयार केली खास गाडी; Wooden Car पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!

गाणं गाणारी ही मुलं खूपच गोड दिसत आहेत. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी डॉ. एम.व्ही.राव यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आनंदी झाले आहेत. तसेच ते या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकाऱ्याने म्हटलंय, “वा! अप्रतिम.’ तर दुसऱ्याने म्हटलंय, या मुलांचे कौशल्य खरोखरच अप्रतिम आहे.’ अनेकजण या मुलांच्या स्टाइलचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This little band is winning everyone heart video viral pvp