Viral video: सोशल मीडियावर सतत वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अतिशय इमोशनल असतात, हे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे .डोळेही पाणवतात. तर, काही व्हिडिओ चेहऱ्यावर हसू घेऊन येतात. लहान मुलांना खेळण्यांनी खेळणे फार आवडते. लहान मुलांना खेळणी प्रचंड आवडतात. पूर्वी लहान मुलांकडे फार खेळणी नसायची मात्र हल्ली प्रत्येक मुलाकडे प्रचंड खेळणी असतात. रोज एक नवं खेळणं दिलं तरी त्यांना खेळणी कमी पडतात. काहींना तर लहानपणापासूनच गाड्यांची आवड असते, गाड्यांसोबत खेळायला त्यांना फार अवडतं.

अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चिमुकल्याच्या गाड्यांचं कलेक्शन पाहून तुमचेही डोळे फिरतील.हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत अरे हा तर अंबानी यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. तुम्हीही पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला उभा आहे, त्याच्या शेजारी त्याचे वडिल गाडीची पूजा करत आहे. यावेळी चिमुकला हट्ट करतो आणि बाबांच्या हातातील अगरबत्ती स्वत:कडे घेतो. त्यानंतर तो पुढे जातो तर लाईनमध्ये त्याची खेळण्यातील एक एक गाडी लावली आहे. तो खऱ्याखुऱ्या गाड्यांसारखच त्याच्या सर्व गाड्यांची पूजा करत आहे. त्याच्याकडे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल असंख्य गाड्या आहेत. यामध्ये सर्वात आधी सायकल मग कार मग जीसेबी, ट्रॅक्टर यासारख्या बऱ्याच गाड्या आहेत. हा चुमुकला त्या सर्व गाड्यांची पूजा करताना दिसत आहे.

या चिमुकल्याच्या एवढ्या गाड्या बघून तुम्हीही डोकं धरालं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: क्रिकेट वेड! जेव्हा कामापेक्षा क्रिकेट जास्त महत्त्वाचं असतं; पठ्ठ्या थेट लॅपटॉपच घेऊन उतरला मैदानात

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @hebaghbhavdya या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

Story img Loader