Little Boys Bowling Viral Video : भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. त्यामुळं लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये क्रिकेटची क्रेझ असते. त्यामुळं गल्लो-गल्ली क्रिकेट हा खेळ खेळला जातो. क्रिकेट म्हंटलं की प्रत्येक मुलाचे स्वप्न असते भारतीय संघात स्थान मिळावे आणि देशाचे प्रतिनिधित्व करावे. मात्र सर्वांच्या नशीबी देशाचे प्रतिनिधित्व नसले तरी हा खेळ प्रत्येकाला खेळावासा वाटतो. क्रिकेट म्हंटलं की लोक आपल्या हातातील कामे सोडून क्रिकेट खेळण्याची उत्सुकता लागलेली असते. आपल्या गल्लीत, मैदानांवर क्रिकेट खेळून आनंद लूटतात. काही लोकं याला गल्ली क्रिकेट तर काही गली क्रिकेट म्हणतात. तुम्ही सुद्दा गल्ली क्रिकेट खेळला असाल तर हा व्हायरल व्हिडीओ तुम्हाला नक्की आवडेल.
सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलाच्या भन्नाट बॉलिंगचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या चिमुकल्याची जबरदस्त बॉलिंग पाहून तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. हा व्हिडीओ यूकेमधला असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलगा रस्त्यावर बसवलेल्या एका बॅटिंग करणाऱ्या माणसाच्या पुतळ्यासोबत क्रिकेट खेळताना दिसतोय. यूकेमधल्या रस्त्यावर एका कोपऱ्यात बॅटिंग करतानाचा एका माणसाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. तिथून जाणारा हा चिमुकला या पुतळ्यासोबत गल्ली क्रिकेटचा आनंद लुटताना दिसतोय. या बॅटिंग करणाऱ्या पुतळ्याच्या दिशेने हा चिमुकला बॉल फेकतो. या मुलाने फेकलेला बॉल बरोबर त्या बॅटिंग करणाऱ्या पुतळ्याच्या बॅटवर जाऊन उसळतो आणि जवळून जाणारा दुसरा माणूस तो सहज पकडतो.
आणखी वाचा : VIRAL : दहीहंडी फोडण्यासाठी मद्यधुंद व्यक्ती ८० फूट उंचावर चढला आणि ५५ हजार रूपयांचं बक्षिस मागू लागला
त्यानंतर या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर जो आनंद झळकतो, तो खरोखरंच पाहण्यासारखा आहे. गल्ली क्रिकेटचा हा निखळ आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकताना दिसतो. हा व्हिडीओ इंग्लंडच्या बार्मी आर्मीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ‘नो फूटवर्क’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागल्या.
आणखी वाचा : बापरे! गेट उघडायला थोडा उशीर झाला तर महिलेने गार्डला मारहाण आणि शिवीगाळ केली, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : माणुसकी अजूनही जिवंत आहे! हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाख ९२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहून लोक त्यांच्या बालपणीच्या आवठणींना उजाळा देऊ लागले आहेत.