ब्रिटनचे राजकुमार हॅरी आणि एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हॅरीचे लक्ष नसताना ही चिमुकली त्याच्याजवळील पॉपकॉर्न खात होती. आपल्या टबमधले पॉपकॉर्न कोणीतरी खात आहे, हे हॅरीच्या लक्षातही आलं नाही. पण स्टेडिअमवर असलेल्या कॅमेरामनच्या नजरेतून ते सुटले नाही. हॅरीनं चिमुकलीची ‘चोरी’ पकडली तेव्हा तिला पॉपकॉर्न देण्यास त्याने गंमतीने नकार दिला, पण नंतर मात्र तिला जवळ घेत त्याने मायेने पॉपकर्न भरवले.

वाचा : शिक्षण अर्धवट राहिलेल्या, कमी वयात लग्न झालेल्या प्रत्येक महिलेने तिची गोष्ट वाचलीच पाहिजे!

ब्रिटन विरुद्ध युके व्हॉलिबॉल सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या चिमुकलीचं नाव एमिली आहे. राजकुमार हॅरी यांच्या जवळचा मित्र डेव्हिड हॅन्सन याची ती मुलगी आहे. हॅरी हॅन्सन कुटुंबीयांसोबत व्हॉलीबॉल सामना पाहण्यासाठी गेला होता.

वाचा : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! सात वर्षांच्या मुलाने बिबट्याच्या तावडीतून मित्राला वाचवलं

Story img Loader