मोबाईल ही आता गरजेची वस्तू झाली आहे हे म्हणतात ते काय खोटे नाही. माणसे मोबाईलच्या नादात जेवण विसरतात. एकवेळ माणूस इतर कामे विसरेल पण मोबाईल विसरणार नाही हे खरे. या मोबाईलचे वेड इतके की काही तर झोपताना देखील मोबाईल उशाशी घेऊन झोपतात. तो हरवला तर अत्यंत मौल्यवान वस्तू गमावल्यासारखे टेंन्शन येते आणि तो शोधण्यासाठी माणूस काय काय करू शकतो याचा प्रत्यय आणणारी एक पोस्ट सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. या मुलाने हवरलेला मोबाईल शोधण्यासाठी चक्क शौचालयाच्या टाकीत उडी मारली. काटो लार्ससेन असे या मुलाचे नाव असून त्याच्या मित्राचा फोन चुकून शौचालयाच्या टाकीत पडला. तो शोधून देण्यासाठी त्याने चक्क टाकीत उडी घेतली. या मुलाला फोन तर मिळाला नाहीच पण या मुर्खपणामुळे हा मुलगा १ तासांहून अधिक काळ टाकीत अडकून पडला होता. नॉर्वेमध्ये हा प्रकार घडला. एक तासानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. ‘माझ्या मित्राचा मोबाईल टाकीत पडला होता. मला तो काढायचा होता आणि मी टाकीत जाऊन तो सहज काढू शकतो यावर माझा विश्वास होता म्हणून मी काही विचार न करता टाकीत उडी मारली, पण मला नंतर बाहेर येता आले नाही’ अशी प्रतिक्रिया या मुलाने स्थानिक टीव्हीला दिली. एक तासांनंतर टाकी फोडून या मुलाला बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. ‘मी आयुष्यात पाहिलेली ही सगळ्यात घाणरेडी जागा होती. या जागेत किळसवाणे किडे आणि प्राणी राहतात. आता या घटनेनंतर मला शौचालयात देखील जावसे वाटत नाही’ असेही तो म्हणाला. त्याच्या या मुर्खपणामुळे सध्या सोशल मीडियावर त्याचे खुपच हसे होत आहे.