ऑस्ट्रेलियाच्या बँकस्टाउनमधील एका व्यक्तीने दात वापरून एकत्र बांधलेल्या सर्वाधिक गाड्या ओढल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ट्रॉय कॉनले-मॅग्नसनने १७ नोव्हेंबर २०२१ रोजी केवळ दातांच्या मदतीने पाच एसयूव्ही खेचून हा पराक्रम करून दाखवला आहे. विश्वविक्रमाचा प्रयत्न करतानाचा जुना व्हिडीओ नुकताच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “ट्रॉय कॉनले-मॅग्नसन यांनी केवळ दातांच्या मदतीने ५ गाड्या खेचल्या आहेत.”
व्हिडीओमध्ये पाच एसयूव्ही आकाराची वाहने एकमेकांना दोरीने बांधलेली आपण पाहू शकतो आणि दोरीचे पुढचे टोक ट्रॉयने त्याच्या दातांमध्ये धरले आहे. त्यानंतर तो आपले शरीर किंचित वाकवून आणि सर्व शक्ती दातांमध्ये एकवटून ठेवून हळू पावले मागे घेताना दिसतो. तो त्याची सर्व शक्ती वापरून ही वाहने खेचत आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये ट्रॉयने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे २०२१ च्या सेलिब्रेशनमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला होता. ‘सर्वात जलद, २० मीटरपर्यंत हलके विमान दातांच्या मदतीने खेचणे’ आणि ‘१०० फूटपर्यंत वजनदार वाहन ढकलणे’ यांसारख्या इतर विविध पुरस्कारांसाठी देखील तो ओळखला जातो. तो एक सामाजिक सहाय्यक देखील आहे कारण त्याने अनेक स्थानिक धर्मादाय संस्थांसाठी पैसे उभारण्यासाठी त्याच्या रेकॉर्ड प्रयत्नांचा वापर केला.
टोप्यांच्या वर का असते बटन? या बटणांचं विचित्र नाव माहित आहे का? जाणून घ्या
एका दिवसापूर्वीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अकाऊंटद्वारे पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओला जवळपास ९ हजार लाइक्स मिळाले आहेत. तर दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेर. केवळ दातांनी पाच वाहने खेचू शकणाऱ्या माणसाच्या ताकदीचे कौतुक करत अनेकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एक म्हणाला, “मजबूत काम” तर दुसर्याने टिप्पणी केली, “हे प्रभावी आहे.”
काहींनी त्याची चेष्टाही केली आहे. एक युजर म्हणाला, “मला खात्री आहे की हा माणूस दररोज दगड खातो” तर दुसऱ्याने म्हटलंय, “यामुळे त्याची मान, खांदे आणि पाठीला प्रचंड त्रास होणार आहे.”