काही लोकांना सगळ्यांहून काहीतरी वेगळे करायचे असते. सोशल मीडियावर अशा अवलीयांची काही कमी नाही. जगावेगळे काहीतरी भन्नाट करायचे आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणारे अनेकजण आहेत. सोशल मीडियावर असे शेकडो व्हिडिओ असतील. यातलाचा एक म्हणजे केम्रे कँडर. यु ट्युबवर त्याने शेअर केलेल्या व्हिडिओंना लाखोंनी व्ह्यूज आहेत. केम्रे आंघोळ करतानाचे त्याचे व्हिडिओ यु ट्युबवर टाकतो. पण या व्हिडिओंना लाखोंनी व्ह्यूज मिळण्यासारखे काय आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण तो पाण्याने नाही तर वेगवेगळे पदार्थ वापरून आंघोळ करतो. आपल्या सारख्यांना हे जरा विचित्रच वाटेल पण तरुणांमध्ये तो चांगलाच प्रसिद्ध आहे. हा बाथटबमध्ये पाणी नाही तर बिस्किट, चॉकलेट, बिअर ओतून आंघोळ करतो. आता तर या सगळ्यांहून वरचढ प्रकार त्याने केला आहे. १ हजार २५० चिली सॉसच्या बाटल्या बाथटबमध्ये ओतून त्याने यात चक्क आंघोळ केली आहे. मिरचीचा एक तुकडा जरी तोंडात गेला तरी जीभ किती भाजते पण त्याने तर चक्क चिली सॉसमध्येच आंघोळ केली त्यामुळे तुम्ही कल्पना करु शकतात की केम्रे सोशल मीडियावर इतका प्रसिद्ध का आहे तो. या व्हिडिओमध्ये तो चिली सॉसमध्ये पाण्यात डुंबत असल्यासारखा डुंबत होता. इतकेच नाही तर त्यांनी यात मिरच्या देखील टाकल्या. आपल्या फॅन्सना दाखवण्यासाठी त्याने या मिरच्या खालल्या आणि याच सॉसमध्ये त्याने डुबकी लावली. त्याचा हा चीली सॉसने आंघोळ करणाचा भन्नाट प्रकार इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत ३० लाखांहून अधिक जणांनी तो पाहिला आहे.

Story img Loader