सिंह हा अतिशय हिंसक प्राणी आहे. म्हणूनच जंगलात आणि प्राणीसंग्रहालयात जाणाऱ्या लोकांना सिंहापासून दूर राहण्यास सांगितले जाते. पिंजऱ्यात राहिल्यानंतरही हा प्राणी सर्वात धोकादायक आहे. यानंतरही काही लोक सिंहाची थट्टा करणे सोडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात सिंहासोबत मस्करी करणे एका माणसाला चांगलेच महागात पडले आहे.
हा व्हिडीओ आफ्रिकेतील जमैकन प्राणीसंग्रहालयातील आहे. एक व्यक्ती प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यादरम्यान पिंजऱ्यात सिंह पाहिल्यानंतर त्याने त्याची थट्टा सुरू केली. सिंहाशी मस्करी करण्याची जी किंमत त्या व्यक्तीला चुकवावी लागली, ती त्याला आयुष्यभर लक्षात राहील. व्हिडीओ अतिशय भयानक आहे. जमैकन प्राणीसंग्रहालयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लग्नाचा मेकअप करतानाच गाढ झोपी गेली नववधू; Video सोशल मीडियावर व्हायरल
व्हिडीओमध्ये तुम्ही तो माणूस पाहू शकता. प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी आलेले सर्व लोक जेव्हा सिंहाचे फोटो काढत होते, तेव्हा ही व्यक्ती वेगळ्याच मूडमध्ये दिसली. यानंतर त्याने सिंहाच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा प्रयत्न केला. सिंहाला त्या व्यक्तीचा हा प्रकार अजिबात आवडला नाही. त्यानंतर त्याने त्या व्यक्तीचा हात आपल्या तोंडात घेतला. संतप्त सिंहाने त्या माणसाचे बोट तोंडात दाबल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हायवेवरच्या फलकाला लटकून केली Exercise; Viral Video पाहून नेटकरी झाले हैराण
यानंतर तो माणूस आपला हात सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहिला, परंतु त्याला सिंहाच्या तोंडातून हात काढता आला नाही. या दरम्यान, सिंहाने त्या व्यक्तीच्या हाताचे एक बोट चावले. @OneciaG नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.