सोशल मीडियाचा वापर कोण कसा करेल काही सांगता येत नाही, म्हणजे काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाचा वापर हा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी केला जायचा. हळूहळू सोशल मीडियाचा आवाका वाढत गेला आणि वेगवेगळ्या कारणांसाठी त्याचा वापर होऊ लागला. माहितीची देवाण घेवाण करणं, आपली कला लोकांपर्यंत पोहोचवणं अशा अनेक कारणासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ लागला. पण याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत म्हणा. आता सोशल मीडियाचा वापर भलेही आपण चांगल्या कारणांसाठी करत असलो तरी काही लोक मात्र या व्यासपीठाचा कसा वापर करतील याचा नेम नाही बुवा!

आता या फोटोचंच घ्या ना! कोणी एका तरूणानं एकदम ‘भारी’ पोजमध्ये फोटो काढला अन् तो सोशल मीडियावर अपलोड केला. या लेकाला त्याच्या प्रोफाईलवर शेकडो लाईक्स आले असतीलही पण ‘लय भारी’ पोजमध्ये अपलोड केलेला हा फोटो सोशल मीडियावर एवढा व्हायरल होईल याची कल्पनाही त्यानं केली नसेल हे नक्की! तेव्हा वेगवेगळ्या पेजवर या तरुणाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. आता या तरूणाची एवढी ‘भन्नाट’ पोज पाहून प्रख्यात फोटोग्राफर्सनंही डोक्यावर हात मारला असेल हे नक्की ! तेव्हा या व्हायरल फोटोवर सोशल मीडियावर एकापेक्षा एक तुफान प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत आता तुम्हीच पाहा हा फोटो पाहून लोक काय म्हणतायेत ते.

Story img Loader