सोशल मीडियावर रोज काही ना काही फोटो व्हायरल होत असतात. आजही एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला खूप हसू येईल. फळांचा राजा आंबा हा अगदी प्रत्येकाचं आवडत फळ आहे. आपल्या अंगणात किंवा आजूबाजूला आपलं आंब्याचं झालं असेल मग तर आपण आंब्याच्या सीजनमध्ये त्या झांडाची विशेष निगराणी करतो. अशीच अगदी Z+ सुरक्षा असलेला आंब्याचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत.
काय आहे व्हायरल फोटोमध्ये?
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मधमाशांच्या पोळ्यावर आंबा लटकलेला दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या मधमाशांनी जणू त्या आंब्याला झेड प्लस सुरक्षा दिल्यासारखं वाटत आहे. त्यांना त्रास दिल्यावर तर त्या खूप तीव्रतेने चावतात, ज्यामुळे खूप वेदना होतात. अशा परिस्थितीत अनेक मधमाशा आंब्याचे रक्षण करत आहेत, हे दाखवणारा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
(हे ही वाचा: ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर चक्क हत्तीने धरला ठेका!; Video Viral)
(हे ही वाचा: पाचगणीमध्ये ‘धुळी वावटळ’; निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा Video Viral)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर लोक या फोटोला खूप पसंत करत आहेत. हा फोटो ट्विटरवर ipsvijrk नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहे. या फोटोसोबत कॅप्शनही लिहिले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘हंगामातील पहिला आंबा, तोही झेड सुरक्षासह!’ या फोटोला आतापर्यंत जवळ जवळ ४० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर या फोटोवर अनेकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.