मागील दोन वर्षांपासून करोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी या विषाणूमुळे आपला प्राण गमावला. करोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. एकप्रकारे, मास्क आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंपैकी एक झाला आहे. घराबाहेर पडण्यावेळी आपल्याला मास्क लावणे अनिवार्य आहे. तथापि काही लोकांना जास्तवेळ मास्क लावल्याने काही शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच काहीही खात-पित असताना मास्क काढावेच लागते. याच गोष्टी लक्षात ठेवून कोरियाच्या एका कंपनीने अनोखा मास्क तयार केला आहे. हा मास्क आपल्या डिझाइनमुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दक्षिण कोरियामधील एटमन या कंपनीने हा अनोखा मास्क तयार केला आहे. या मास्कचे वैशिष्ट्य म्हणजे हा मास्क केवळ नाक झाकतो, तर आपले तोंड उघडे राहते. याचे नाव कोस्क (Kosk) असे ठेवण्यात आले आहे. तथापि, अर्धवट वाटणारा हा मास्क आपण पूर्ण देखील घालू शकतो. किंवा फोल्ड करून फक्त नाकापुरता याचा वापर करू शकतो.
जिवंत पतीला मेलेला सांगून १० वर्ष घेत होती पेन्शनचा लाभ; जाणून घ्या कसा झाला प्रकरणाचा खुलासा
या मास्कच्या अनोख्या डिझाइनमुळे खाण्या-पिण्याच्या वेळी हा मास्क अत्यंत फायदेशीर ठरतो. ज्यांना श्वसनासंबंधी समस्या आहे त्यांच्यासाठी हा मास्क उपयुक्त आहे. या मास्कला ‘कोस्क’ असे नाव देण्यात आले आहे कारण ‘कोस्क’ हा कोरियामध्ये नाकासाठी वापरला जाणारा ‘को’ आणि मास्क या शब्दाचा संयोग आहे.
या मास्कला केएफ८० टॅग देण्यात आला आहे. यामध्ये के हे अक्षर कोरियन आणि एफ हे अक्षर फिल्टर या शब्दासाठी वापरण्यात आले आहे. हे मास्क ०.३ मायक्रॉन कण ८०% कार्यक्षमतेने फिल्टर करू शकते असा दावा या कंपनीने केला आहे.