काही वर्षांपूर्वी, ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असे लिहलेली एक भारतीय चलनी नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर लोकांनी त्याची खूप खिल्ली उडवली. यावरून बरेच मीम्स बनवले गेले. आता असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोणीतरी १० रुपयांच्या नोटेवर एक विचित्र गोष्ट लिहून ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्या चिठ्ठीवर कोणीतरी पेनने लिहिले आहे, ‘विशाल, मेरी शादी २६ अप्रैल को है. मुझे भाग के ले जाना, आय लव्ह यू. तुम्हारी कुसुम.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही नोट पाहता असे दिसून येते की काम नावाच्या मुलीचे लग्न इतर कुणाशी तरी होणार आहे आणि या संदेशाच्या माध्यमातून ती आपल्या प्रियकराला तिला त्याच्यासोबत पळवून घेऊन जाण्यास सांगत आहे. या मुलीने तिच्या प्रियकरासाठी लिहलेल्या संदेशाने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. २६ एप्रिलपूर्वी कुसुम तिच्या विशालला भेटेल या आशेने अनेकांनी ट्विटरवर ट्विट केले आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ट्विटर यूजर्स तुमची ताकद दाखवा, कुसुमचा हा संदेश २६ एप्रिलपूर्वी विशालपर्यंत पोहचवुया आणि दोन प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र आणूया ‘.

Viral Video : बांगलादेशी सुपरस्टारसोबत राणू मंडलचं नवं गाणं, सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत

विमानात अचानक रडू लागली फ्लाइट अटेंडंट; Viral Video पाहून तुम्हीही व्हाल भावुक

आता हा फोटो ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत असून प्रत्येकजण ते शेअर करत आहे. एवढेच नाही तर या पोस्टची खिल्ली उडवली जात आहे. लोक विशाल आणि कुसुम नावाच्या लोकांना टॅग करत आहेत. एका यूजरने गंमतीत लिहिले की, ‘जोपर्यंत ही मोठी बातमी विशालपर्यंत पोहचेल तोपर्यंत विशाल दोन मुलांचा मामा बनेल.’ तर दुसर्‍याने लिहिले, ‘जितके विशाल आहेत, तितक्या सर्वांना पोस्टवर टॅग करा. दोघांनाही एकत्र आणलच पाहिजे.’ त्याचवेळी तिसऱ्याने लिहिले की, ‘२६ एप्रिल रोजी १० विशाल कुसुमला पळवून नेण्यासाठी पोहचतील असं नको व्हायला.’

काही महिन्यांपूर्वी, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी २० रुपयांच्या नोटेचे चित्र – ‘राशी बेवफा है’ ट्वित्तरवर व्हायरल झाले होते, ज्यामुळे बरेच मीम्स व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This message was written by a girl for her lover on a 10 rupee note the netizens united to bring the two lovers together pvp