अनेकदा आपण ठराविक दृष्टीकोनातूनच एखाद्या गोष्टीकडे बघत असतो कदाचित त्याव्यतिरिक्तही त्या गोष्टीत काही वेगळे दडले असते हे आपण पूर्णपणे विसरून जातो. पण जसे दिसते तसे नसते हे मात्र आपण पूर्णपणे विसरतो. ब्रेन गेमच्या खेळातही असेच होते. आपण कल्पानाही करु शकत नाही इतके समोरच्या गोष्टीत नाविन्य असते पण आपला मेंदू मात्र ते नाविन्य न शोधता काहीतरी वेगळेच पाहत असतो. आता हेच बघाना सोशल मीडियावर एक अफलातून जीआयएफ फाईल व्हायरल होत आहे. एका काळ्या वर्तुळात अनेक छोटी वर्तुळे फिरताना दिसत आहेत. कदाचित तुमच्यापैकी अनेकांच्या फेसबुक, ट्विटरवर ही जीआयएफ फाईल आली असेल. या जीआयएफ फाईलमध्ये तुम्हाला काय दिसले असा साधा प्रश्न त्यासोबत विचारला जातो. ही फाईल बघून अगदी शेमडं मुलही उत्तर देईल की एका काळ्या वर्तुळात अनेक लहान वर्तुळे वर्तुळाकार फिरत आहेत. पण वर म्हणाले तसे हे कोडे म्हणावे तसे सोप्पे नाही, कारण यात लपला आहे खरा ब्रेन गेम..

viral : तिच्या तीन पायांचे रहस्य काय?

‘सायन्स’ या ट्विटर अकाऊंटवरून एक जीआयएफ फाईल शेअर करण्यात आली. काळ्या वर्तुळात आणखी काही लहान वर्तुळे आहेत. ही वर्तुळे एका ठराविक दिशेने वर्तुळाकार फिरत परिक्रमा करत आहेत. आता कोणालाही ही फाईल पाहिल्यावर असेच दिसणार. पण खरे कोडे पुढे आहे. यात एक वेगळेपण दडलंय आणि तेच वेगळेपण बघ्यांना शोधायचे आहे. जो याचे उत्तर अचूक शोधेल त्याची बुद्धीमत्ता अधिक उत्तम. त्यामुळे यातले वेगळेपण शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण हाती काहीच आले नाही. कारण आपण नेहमीच एका गोष्टीकडे ठराविक दृष्टीकोनातून बघत असतो. या फाईलच्या बाबतीतही असेच झाले. शेवटी सायन्सने या वर्तुळाकडे बघण्याच्या वेगळा दुष्टीकोन दिला. या काळ्या वर्तुळाला आरे आहेत आणि या वर्तुळाच्या आतमध्ये फिरणारी छोटी वर्तुळे ही एका सरळ रेषेत त्या आ-यांभोवती फिरत आहेत, पण अनेकांना मात्र ते लक्षात येत नाही. आहे की नाही मस्त ब्रेन गेम!

वाचा : या व्हायरल फोटोचे कोडे सुटता सुटेना

Story img Loader