आजकाल प्रत्येकालाच फॅशनेबल दिसायचं असतं. यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. सध्या थोड्याफार फाटलेल्या जीन्स घालायची फॅशन सुरु आहे. यामुळे आपल्याला कुल आणि कॅज्युअल लुक मिळतो असं तरुणांचं म्हणणं आहे. बाजारात अशा जीन्स फारच महाग मिळतात. एक जीन्सची किंमत किती असू शकते? जीन्स आपल्याला कमीतकमी ५०० रुपये ते जास्तीत जास्त २ ते ४ हजार या किमतीमध्ये मिळतात. मात्र सध्या समोर आलेली बातमी वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. नुकतीच एक जीन्स तब्बल ६२ लाखांना विकली गेली आहे. या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘जुनं ते सोनं’ ही म्हण आपण अनेकदा ऐकली आहे. काही पुरातन वस्तू खूपच मौल्यवान असतात. तुम्ही ‘विंटेज’ गोष्टींबद्दल ऐकलंय का? सध्या अशीच एक विंटेज जीन्स तुफान व्हायरल झाली आहे. न्यू मेक्सिको येथे एका लिलावामध्ये एक जीन्स तब्बल ७६ हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास ६२ लाख ६० हजारांना विकली गेली आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की ही जीन्स इतक्या मोठ्या किमतीला विकली जाण्याचं कारण काय आहे? तर, ही जीन्स लिव्हाइस या ब्रॅण्डची असून ती १८८० या साली तयार करण्यात आली होती.
चार मुलांची आई पडली प्रेमात; पतीला कळत्याच त्याने ‘करवा चौथ’च्या दिवशीच…
वॉल स्ट्रीट जर्नलने छापलेल्या एका रिपोर्टनुसार, १ ऑक्टोबर रोजी झालेल्या लिलावामध्ये सॅन डिएगोमधील विंटेज कपड्यांचे विक्रेता काईल हाउपर्ट यांनी ही जीन्स विकत घेतली. विशेष म्हणजे ही जीन्स विकत घेतल्यानंतर काईल स्वतःच थक्क झाले होते. या रिपोर्टमध्ये सांगितलंय की काईल यांनी झिप स्टीवन्सन यांच्यासह ही जुनी जीन्स विकत घेतली आहे. झिप स्टीवन्सन हे डेनिम डॉक्टर्स या विंटेज कपड्यांच्या कंपनीचे मालक आहेत.
काईलने या बोलीसाठी ९० टक्के रक्कम स्वत: दिली आहे. स्टीव्हनसनला या क्षेत्रात खूप अनुभव असून या जीन्ससाठी ते नक्कीच खरेदीदार शोधतील असा विश्वास त्यांना आहे. काही वर्षांपूर्वी एका जुन्या खाणीत या अँटिक जीन्स सापडल्या होत्या. खाणीत काम करणाऱ्या एका कामगाराकडे या जीन्स सापडल्या.
या जीन्सची स्थिती चांगली आणि घालण्यायोग्य आहे. अमेरिकन कपड्यांची कंपनी लिव्हाइसची स्थापना १८५३ मध्ये झाली. ‘नाऊ दिस न्यूज’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जीन्सचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनी या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहले, ‘ठीक आहे… मी माझी लिव्हाइसची जीन्स सांभाळून ठेवीन आणि पुढच्या पिढीला देत राहीन.’ तर दुसऱ्याने लिहलंय, “मला अशी एक जोडी थ्रिफ्ट स्टोअरमध्ये १३ डॉलर्स म्हणजेच सुमारे एक हजार रुपयांमध्ये मिळू शकते.