आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून अनेक अवलिया माणसांना पाहिलं असेल, पण १८० अंशात घुबडासारखी मान वळवणाऱ्या मुलाला नक्कीच पाहिलं नसेल. चला तर, सोशल मीडियावर चर्चेत असेलल्या अशा मुलाबद्दल जाणून घेऊयात. जो १८० अंशात आपली मान फिरवू शकतो किंवा आपल्या लवचिकतेचा वापर करून हात, पाय कसेही फिरवून शकतो.

लवकरच या देशात मुलांच्या सोशल नेटवर्किंग वापरावर येणार बंदी?

या मुलाचं नाव आहे मोहम्मद समीर, तो फक्त १४ वर्षांचा आहे. मोहम्मदमध्ये इतरांपेक्षा सर्वात हटके गुणे आहे ते म्हणजे कोणत्याही अंशात आपली मान, हात-पाय फिरवण्याचे. त्याच्या लवचिकतेला तोड नाही, त्याची ही करामत पाहून त्याला सोशल मीडियावर ‘ह्युमन आऊल’ असं नाव पडलं आहे. मोहम्मद कराचीचा आहे. सध्या तो एका डान्स ग्रुपचा भाग आहे. मोहम्मदचे वडील सतत आजारी असतात, त्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी मोहम्मदवरच आहे. तो आपली ही कला दाखवून महिन्याला चांगले पैसे कमावतो, या मिळकतीवर त्याचं घर चालतं.

Indigo Airlines Controversy : ‘माझ्या बॉसलाही तुडवा’, इंडिगोवरची उपरोधिक टीका सोशल मीडियावर व्हायरल

समीर वयाच्या सहाव्या वर्षांपासून मान वळवण्याचा सराव करत आहे. हॉलिवूडमधल्या भयपटांमध्ये त्याने भूतांना अशाप्रकारे मान वळवताना पाहिलं होतं, तेव्हापासून हा प्रयोग करण्याचं खूळ त्याच्या डोक्यात पक्क बसलं, आईने त्याला अनेकदा विरोध केला पण त्याच्या हट्टापुढे तिने हात टेकले, आता समीर लवचिक शरिराचा पुरेपूर वापर करून लोकांचं मनोरंजन करतो आणि कुटुंबाचं पोटही भरतो.

(ट्रेडिंग सेक्शनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या सोशल मीडियावर काय व्हायरल होतंय यावरून केलेल्या असतात. त्याची सत्यता पडताळून बघू शकत नाही.)