Pakistan Family Unique Record:  कुटुंबं म्हटलं की बऱ्यापैकी त्या कुटुंबातील सदस्यांमध्ये काही ना काही साम्य असतं. भावंडांमध्ये प्रत्येकजण वेगळं असतं, कोणी आईवर जातं कोणी बाबांवर जात. दरम्यान पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या लरकाना येथे राहणाऱ्या कुटुंबाच्या नावे एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या कुटुंबाची गोष्ट सांगितली आहे. ९ सदस्यांच्या या कुटुंबात एक गोष्ट सारखीच आहे, ती म्हणजे त्यांची जन्मतारीख. कुटुंबातील सर्व सदस्यांचा जन्म १ ऑगस्टला झाला आहे.

संपूर्ण कुटुंब एकाच दिवशी आपला वाढदिवस साजरा करतं. वडील अमीर अली, आई खुदेजा आणि त्यांची सात मुले सिंधू, सासुई, सपना, अमीर, अंबर, अम्मार, अहमर या सर्वांचा जन्म एकाच दिवशी झाला आहे.

Jeet Adani Diva Shah Marriage
Jeet Adani : विवाहापूर्वी गौतम अदाणींच्या मुलाची ‘मंगल सेवा’, दिव्यांग भगिनींसाठी केली इतक्या लाखांची तरतूद
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Six people from Dhule sentenced to life imprisonment in murder case
हत्येप्रकरणी धुळे जिल्ह्यातील सहा जणांना जन्मठेप
Police solve problem of relationship between daughter mother and mothers boyfriend
मुलगी आणि प्रियकराच्या नात्यात अडकले आईचे मन, अखेर मुलीनेच…
widow marriage news marathi
बुलढाणा : दिराने विधवा वहिनीचे लग्न जुळविले…पित्याच्या भूमिकेत कन्यादानही केले…
Woman with baby in babys belly gives birth safely
‘फिट्स इन फिटू’ : ‘त्या’ महिलेची प्रसूती सुखरूप! पोटातील बाळाची शस्त्रक्रिया…
Prateik Babbar second marriage date out
स्मिता पाटील यांचा मुलगा करतोय दुसरं लग्न, प्रतीकच्या लग्नाची तारीख आली समोर; होणारी पत्नी कोण? वाचा…
Rakesh Roshan on Son Divorce
“सुझान खान आजही आमच्या कुटुंबातील सदस्य…”, ऋतिक रोशनच्या घटस्फोटावर वडील राकेश रोशन यांनी व्यक्त केलं मत

अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड

सर्व मुलांचे वय १९ ते ३० वर्षांच्या दरम्यान आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा जन्म १ ऑगस्ट रोजी झाला होता. एका दिवसात कुटुंबातील सर्वाधिक सदस्यांचा जन्म होण्याचा हा जागतिक विक्रम आहे. हा विक्रम यापूर्वी १९५२ ते १९६६ दरम्यान २० फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या अमेरिकन कमिन्स कुटुंबातील पाच मुलांकडे होता. पाकिस्तानी कुटुंबाचा शोध लागेपर्यंत या कुटुंबाचे फक्त नाव रेकॉर्डवर होते. मात्र आता पाकिस्तानातील कुटुंबाने हा रेकॉर्ड मोडला आहे.

स्वत: पालकही या प्रकाराने आश्चर्यचकीत आहेत.

१ ऑगस्ट १९९२ रोजी आपल्या पहिल्या मुलाचा सिंधूच्या जन्मानंतर अमीर अली खूप आश्चर्यचकित आणि आनंदी देखील होते, त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचाही वाढदिवस एकाच दिवशी होता. प्रत्येक मूल एकाच तारखेला जन्माला येईल अशी कोणीही कल्पना करू शकत नाही. त्यांचा दावा आहे की खुदेजाची प्रसूती कधीच लवकर झाली नाही किंवा सी-सेक्शनद्वारे कोणत्याही मुलाची प्रसूती वेळेआधी झाली नाही. पती-पत्नीने सांगितले की त्यांनी असे काही प्लान केले नव्हते, ते स्वतःच घडले. त्यामुळे ही आम्ही अल्लाहची देणगी मानतो असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा – VIDEO: सावधान! फ्री फायर गेमचं व्यसन; मुलाने गमावलं मानसिक संतुलन; पहा काय झालीय अवस्था

आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला किंवा दुसरं मूल असेल तर ते पहिल्या मुलाच्या वाढदिवसाला जन्माला यावं. म्हणून काही पालक मुद्दामहून तसं प्लॅनिंग करतात. पण नैसर्गिकरित्या असा जन्म होणं म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल. तोसुद्धा आई-बाबा आणि त्यांच्या सातही मुलाचा. पाकिस्तानातील हे कुटुंब म्हणूनच चर्चेत आलं आहे.

Story img Loader