या जगात वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगवेगळं. आपली वेगळी ओळख असावी असं प्रत्येकालाच वाटतं आणि ही ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण स्वत:वर मेहनत घेत असतो. पाकिस्तानमधल्या या तरूणाने किशोरवयात असल्यापासून स्वत:चे शरीर कमावण्यात एवढी मेहनत घेतली की आता त्याला सारं जग पाकिस्तानचा ‘हल्क’ म्हणून ओळखू लागलाय.
अर्बाब हयात असं त्याचं नाव असून, तो जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचं वजन साडेचारशे किलोच्या आसपास आहे. त्याला हल्कबरोबर ‘खान बाबा’ या नावानेही ओळखलं जातं. एका हाताने माणासांना हवेत उचलणं, मोठ्या गाड्या ओढणं अशी कामं तो अगदी सहज करतो. अर्बाब रस्त्याने चालतो तेव्हा त्याची शरिरयष्टी पाहून सगळेच जण आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत बसतात.
Viral Video : आफ्रिकन गायकाचं ‘झिंगाट…’ गाणं ऐकून तुम्हीही ‘सैराट’ व्हाल!
किशोरवयात असल्यापासून बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भाग घेण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि तेव्हापासून त्याने शरीर कमवायला सुरूवात केली. विशेष म्हणजे त्याचा दिवसाचा खुराकही खूप जास्त आहे. तो न्याहरीत दररोज ३६ अंडी, ५ लिटर दूध आणि ३ किलो मांस खातो. त्याचं वजन हे प्रमाणापेक्षा जास्त असलं तरी अजूनही त्याची तब्येत चांगली आहे.
वाचा : चर्चा तर होणारच! पाकिस्तानी गार्डला करायचंय विराट कोहलीशी लग्न