एलओसी म्हटले की तुमच्या डोळ्यासमोर काय येते ? भारत पाकिस्तानच्या सीमा, सीमेवर सुरू असणारा तणाव, दोन्ही सीमेवर आपापल्या देशाच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून गस्त देत असलेले सैनिक. पण पाकिस्तानमधल्या काही तरूणांच्या डोळ्यासमोर ‘LOC’ म्हटले की येतो स्वादिष्ट पिझ्झा.
पाकिस्तानमधला ‘सत्तार बक्स’ हा कॅफे एलओसी पिझ्झासाठी प्रसिद्ध आहे. ‘स्टार बक्स’या कॅफेची ही नक्कलच म्हणता येईल. या कॅफेचा लोगोही ही अगदी स्टार बक्सच्या लोगोशी मिळता जुळता आहे. या कॅफेमध्ये एलओसी पिझ्झा मिळतो. यात पिझ्झा बेसच्या अर्ध्या भागात मांसाहारी टॉपिंग तर अर्ध्या भागात शाकाहारी टॉपिंग असते. या पिझ्झ्याच्या मांसाहारी भागात पाकिस्तानचा तर शाकाहारी भागा भारताचा झेंडा लावण्यात आला आहे. खरे तर दोन्ही देशांत शांतता नांदावी आणि लोक सुखी राहावे यासाठी या पिझ्झाची कल्पना सुचली असल्याचे सत्तार बक्स कॅफेने सांगितले.
या कॅफेमध्ये फक्त एलओसी पिझ्झाच नाही तर अनेक चित्र विचित्र नावाचे पदार्थ मिळतात. ‘टॉपलेस बेशरम बर्गर’ ‘जिंगा लाला’ हे पदार्थ त्यातलेच एक. सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध अधिकच ताणले आहेत त्यामुळे सोशल मीडियावर जणू भारत पाकिस्तानचे शाब्दिक युद्धच पाहायला मिळते. पण पाकिस्तानमधल्या या एलओसी पिझ्झाने हा तणाव कुठेतरी बाजूला ठेवून चर्चाला एक वेगळा विषय नेटीझन्सना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा