भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे जगभरात चाहते आहेत. आपल्या आक्रमक खेळी आणि हटके स्टाईलनं विराटनं अगदी कमी काळातच क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यामुळे त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यातून यात मुलींची संख्या तर थोडी अधिकच आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मैदानात विराट उतरला की त्याला चिअर अप करण्यासाठी मुलीही तेवढ्याच पुढे असतात. आता यातल्या सर्वाधिक मुलींना त्याला एकदा जवळून पाहण्याची, त्याच्यासोबत डेटला जाण्याची किंवा लग्न करण्याची इच्छा असेल. किंबहुना प्रत्येक क्रिकेटच्या अशा ‘फॅन’ असतात ज्यांना त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा असते. त्यामुळे मैदानात एखादी मुलगी ‘मॅरी मी’चं पोस्टर हातात घेऊन उभी राहिली तर आपल्याला फार काही नवल वाटत नाही. पण हाच ‘मॅरी मी’ पोस्टर घेऊन एखादा पुरूष उभा राहिला तर ?

वाचा : ‘बोल ना आंटी आऊ क्या’ म्हणणारा ओमप्रकाश आहे तरी कोण?

सध्या लाहोरमधील एका सुरक्षारक्षकाच्या फोटोने सगळ्यांना चर्चेसाठी नवा विषय दिलाय. ‘कोहली माझ्याशी लग्न कर’, अशी लग्नाची मागणी घालणारं पोस्टर घेऊन तो स्टेडियममध्ये उभा होता. आतापर्यंत विराटला अनेक चाहत्यांनी लग्नासाठी विचारलं असेल पण कोहलीसाठी आलेलं हे लग्नाचं प्रपोजल मात्र सगळ्यात हटके होतं. या सुरक्षारक्षाकाचं नाव काय आहे ते समजलं नाही. आता त्याने स्वत:हून हे पोस्टर हातात घेतले की कोणतरी त्याला मुद्दामहून हे पोस्टर पकडायला सांगितले हेही स्पष्ट होत नाही. पण कोहलीसाठी आलेलं हे पाकिस्तानी प्रपोजल मात्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे हे नक्की!

वाचा : पाहा चीनमधल्या सर्वात मोठ्या कंपनीचा संस्थापक वर्धापन दिनाच्या सोहळ्यात काय करतो!

Story img Loader