जेव्हाही पैसे कमावण्याचा विचार आपल्या डोक्यात येतो तेव्हा धकाधकीचे आयुष्य डोळ्यासमोर उभे राहते. महिनाभर ऑफिसमध्ये जाऊन मेहनत केल्यानंतर आलेला पगार बघता बघता संपतो. तसेच जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना तो सांभाळावा लागतो आणि आपल्या ग्राहकांना आकर्षित करावे लागते. यातून मिळणाऱ्या नफ्यातून त्यांचा उदरनिर्वाह होतो. आपल्यापैकी अनेकजणांना असे वाटते की जर घरबसल्या पैसे कमावता आले असते तर किती बरं झालं असतं. तुम्ही फक्त विचार करत असाल, पण ही गोष्ट वास्तवात घडते आहे. आजच्या काळात असे संभव आहे. असा एक व्यक्ती आहे जो घरबसल्या कार्टून पाहतो आणि त्याला त्याचा पगार मिळतो.
तुमच्या घरी आरामात कार्टून शो पाहण्याची नोकरी कोणी तुम्हाला देऊ केली आणि त्यासाठी तुम्हाला पाच लाख रुपये मिळतील असे सांगितले, तर सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे पूर्णपणे खरे आहे. प्रत्येकाला अशी स्वप्नवत नोकरी मिळत नाही. युनायटेड किंगडममधील नॉटिंगहॅम येथे राहणाऱ्या अलेक्झांडर टाउनलीकडेही अशीच नोकरी आहे. जगभरात अशा अनेक नोकऱ्या आहेत. बर्गर किंवा पिझ्झा टेस्टर, हॉटेल रिव्ह्यू यासारख्या कामासाठी अधिक पैसे दिले जातात. मात्र, अलेक्झांडर टाउनलीचे काम अतिशय खास आहे.
फक्त सहा तास झोपून ‘ही’ व्यक्ती कमावते लाखो रुपये; Sleep Stream ठरतंय लोकप्रिय
नॉटिंगहॅम येथील २६ वर्षीय अलेक्झांडर टाउनली याला ही नोकरी मिळाली. तो त्याचा आवडता कार्टून शो ‘द सिम्पसन्स’ तासनतास पाहत असतो. तो सध्या त्याचा आवडता कार्टून शो पाहून प्रति वर्ष £5,000 म्हणजेच पाच लाख रुपयांहून अधिक पैसे कमावतो. हे काम रोजचे नसून आठवड्यातून काही दिवसच त्याला हे काम करावे लागते. त्याला कार्टून शो पाहण्यासाठी डोनट्सची पाकिटेही पाठवली जातात. जेणे करून तो खाता खाता आपले काम पूर्ण करू शकेल. त्याच्या भावाने त्याला या कामाबद्दल सांगितले होते आणि तो त्यासाठी तयार झाला होता.
विशेष म्हणजे, अलेक्झांडरला कार्टूनचे सर्व भाग अतिशय काळजीपूर्वक पहावे लागतात आणि त्याचे विश्लेषण करावे लागते. त्यामुळे त्याला आपले काम अत्यंत गांभीर्याने करावे लागते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एपिसोड पाहताना तो हातात वही आणि पेन घेऊन बसतो आणि कार्टून्सच्या अनेक बाबींची नोंद करतो. त्याला एपिसोडच्या क्रेडिट्सपासून ते एडिटिंगपर्यंत सर्व काही तपासावे लागते.
Viral: दहा वर्षांपूर्वी हरवलेला आयफोन सापडला टॉयलेटच्या आत; असा झाला प्रकरणाचा उलगडा
आपल्याला ऐकायला मजा येत असेल, पण हे अलेक्झांडरचे खरे काम आहे. तो एका कॅफेमध्ये सुपरवायझर म्हणूनही काम करतो. तो एका दिवसात ३० भाग पाहतो आणि त्याला एकूण ७१७ भागांचे विश्लेषण करावे लागते.