अमेरिकेतल्या मॅनहॅटनधली एक फॉर्मसीने राबवलेले धोरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या फॉर्मसीने स्त्री पुरुष समानता म्हणून पुरुषांकडूनही ७ टक्के कर घेण्याचा निर्णय घेतला आहे. थॉम्पसन केमिस्ट या फॉर्मसीमध्ये आतापासून औषध खरेदी करणा-या प्रत्येक पुरुषाला हा कर देणे भाग असणार आहे. तर महिलांना मात्र खरेदी करमुक्त करण्यात आली आहे. या फार्मसीच्या बाहेर अशाप्रकारचे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत.
या दुकानाची मालकीण ज्यूली हिने हा निर्णय घेतला आहे. ‘अमेरिकेतल्या महिला या अनेक सौंदर्य उत्पादनावर पिंक टॅक्स देतात मग अशाच प्रकारचा कर पुरुषांना का नाही ?’ असा सवाल तिने केला आहे म्हणूनच तिने आपल्या फॉर्मसीमध्ये महिला ग्राहकांना करमाफी दिली आहे. तर पुरुष ग्राहकांवर कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यूली हिच्या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कोणी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर अनेकांनी यावर आक्षेपही नोंदवला आहे. या सोमवारपासूनच ज्यूलीने दुकानाचे नवे धोरण जाहिर केले.  तिचे हे धोरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेक जण यावर आपली मते नोंदवत आहेत.

Story img Loader