कोणत्याही मोठ्या हॉटेलमध्ये किंवा प्रसिद्ध हॉटेलमध्ये वेटींगसाठी भली मोठी रांग असते. अशावेळी लोक आधीच बूकिंग करतात, जेणेकरुन जास्तवेळ थांबावं लागत नाही. या हॉटेलचं काही ना काही वैशिष्ठ्य असतं, काही हॉटेल्स त्यांच्या जेवणासाठी प्रसिद्ध असतात तर काही वेगवगळ्या मेन्यूंमुळे प्रसिद्ध असतात. तर काही हॉटेलमधलं वातावरण, अँबिअन्स इतका छान असतो की लोक ते पाहण्यासाठीही जातात. काहीवेळा या हॉटेल्सच्या आकर्षक ऑफरमुळेही लोक गर्दी करतात. खवय्ये आवडीच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी कितीही वेळ वेटींगमध्ये थांबायला तयार असतात, मात्र तुम्हाला कोणी एखाद्या हॉटेलमध्ये ४ वर्ष वेटिंगला थांबण्यासाठी सांगितलं तर? विश्वास बसत नाही ना. पण हे खरंय.
एका टेबल बुकींगसाठी ४ वर्ष वेटिंग
बरेचदा रेस्टॉरंटबाहेर वेटिंग असते. भारतामध्ये हे वेटिंग जास्तीत जास्त ४० ते ५० मिनिटांचे असू शकते. मात्र युनायटेड किंगडममधील सेंट्रल ब्रिस्टलमध्ये असलेल्या ‘द बँक टॅव्हर्न पब’मध्ये टेबल मिळवण्यासाठी तुम्हाला तब्बल ४ वर्षे वाट पहावी लागेल. होय, या ठिकाणी टेबल बुक करणे ही प्रचंड कठीण गोष्ट आहे. म्हणूनच या पबला ‘टेबल बुक करण्यासाठी जगातील सर्वात कठीण रेस्टॉरंट’चा किताब मिळाला आहे.
आता बुकींग केले तर २०२७ मध्ये येणार तुमचा नंबर
जर तुम्हाला या हॉटेलला यायचं असेल तर तुमचा नंबर चार वर्षांनीच येईल. या यूकेमध्ये हॉटेलला रविवारी पार्टी करण्यासाठी चार वर्षे प्रतीक्षा करावी लागते. याचा अर्थ आज किंवा उद्या जर कोणी बुकिंग केले तर त्याचा नंबर 2027 मध्ये येईल. कोरोना, लॉकडाऊनमुळे या हॉटेलचा प्रतीक्षा कालावधी ४ वर्षांपेक्षा जास्त झाला आहे.
स्पेशल डिशसाठी खवय्ये पाहतात वाट
हा प्रसिद्ध यूके पब येथे येणाऱ्या ग्राहकांना दर रविवारी आपला खास संडे रोस्ट सर्व्ह करतो आणि लोकांना तो इतका आवडतो की संडेसाठी टेबल बुक करण्याची मागणी येथे सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे या पबला त्याच्या संडे रोस्टसाठी पुरस्कारही मिळाला आहे. ही पब डिश अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे आणि लोक ती खाण्यासाठी महिने आणि वर्षे वाट पाहत आहेत आणि या कारणास्तव त्याच्या प्रतीक्षा कालावधीने नवीन विक्रम केला आहे.
हेही वाचा – CCTV Video: तेलंगणात भटक्या कुत्र्यांनी चार वर्षांच्या मुलाचे भररस्त्यात लचके तोडले, चिमुकला ओरडत राहीला पण…
दरम्यान, हे हॉटेल १८ व्या शतकापासून या ठिकाणी सुरू आहे. अनेक दंगली, दोन महायुद्धे, बदललेले राजकारण, आपत्ती अशा अनेक घटनांचा साक्षीदार हे हॉटेल आहे.