सध्या हिंदूंचा पवित्र सण नवरात्र सुरू आहे, त्यात लोक मांसाहार टाळून शाकाहारी पदार्थ खातात. अनेक हॉटेल आणि ढाबे किंवा दुकानदारही मांसाहारी पदार्थ विकणे टाळतात. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. शाकाहरी लोकांना मासांहार नाही मात्र मांसाहाराप्रमाणे तिखट असे पदार्थ हवे असतात अशावेळी हॉटेल चालक काही ना काही वेगवेगळ्या डीशेश बनवून देत असतात. अशाच एका डीशचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही डीश शाहाकारी आहे की मांसाहारी हे सांगणं कठीण झालंय.
शंभर टक्के व्हेज चिकन? –
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो एका रेस्टॉरंटमधल्या मेन्यूचा आहे. मात्र हा मेन्यू पाहून तुम्हीही शॉक व्हाल. आतापर्यंत तुम्ही चिकनचे अनेक प्रकार खाल्ले असतील पण कधी व्हेज चिकन खाल्ले आहे का? याच शंभर टक्के व्हेज चिकन मेन्यूचा स्क्रिन-शॉट सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून शाकाहारी लोकांना हे कोणतं व्हेज चिकन असा प्रश्न पडला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता 100% Veg Butter chicken १९९ रुपये असं लिहलं आहे.
पाहा पोस्ट –
हेही वाचा – viral video: धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; चिमुकल्यानं घेतला स्टेअरिंगचा ताबा अन्…
या फोटोला आतापर्यंत ४० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.