नुकतेच रशियामधल्या एका तेल उद्योजकाच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळयातले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्न सोहळ्यात सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती नववधूच्या वेडिंग गाऊनची. फक्त एका वेडिंग गाऊनवर या नववधूने चार कोटींहून अधिक रुपये खर्च केले. रशियातील प्रसिद्ध उद्योजक आणि अब्जाधीश इलखोम शोकिराव यांच्या मुलीचे लग्न नुकतेच मॉस्कोमध्ये पार पडले. या विवाह सोहळ्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे कारण विवाह सोहळ्यासाठी या अब्जाधीशाने कोट्यवधी रुपये खर्च केले. त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची गणना जगातील सगळ्यात महागड्या विवाह सोहळ्यात करण्यात आली आहे.

या सोहळ्यासाठी त्यांच्या मुलीने जवळपास ४ कोटींहून अधिक रुपयांचा वेडिंग गाऊन घातला होता. खास पॅरिसमध्ये हा वेडिंग गाऊन बनवण्यात आला होता . इतकेच नाही तर हा वेडिंग गाऊन हिरेजडित होता त्यामुळे याची अधिक चर्चा होत आहे. पॅरिसमध्ये तयार करण्यात आलेल्या या वेडिंग गाऊनवर चांदीची जर आणि मोती देखील लावले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या सगळ्यात महागड्या वेडिंग ड्रेसमध्ये याची गणना झाली आहे. रशियातले जवळपास ९०० लोक या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित होते. या व-हाडी मंडळीच्या फक्त मनोरंजनासाठी  साडेतीन कोटी खर्च करण्यात आले होते. तर लग्नासाठी १० फूट उंचीचा केकही मागवण्यात आला होता. एखाद्या राजेशाही विवाह सोहळ्यासारखाच हा विवाह सोहळा पार पडला.

Story img Loader