बुरा ना मनो होली है! म्हणत समोरून येणा-या मुलीला रंग लावायचे किंवा फुगे मारायचे, असे प्रकार अनेकदा होतात. या मुली तरी काय करणार? होळी आहे, थोडा रंग लावला किंवा पाठीवर फुगा मारला तर काय बिघडतंय? ती कुठे काय म्हणणार? अशीही अनेकांची मानसिकता असते. रंग लावण्याच्या बाहाण्याने तिची छेड काढणे किंवा स्पर्श करण्यासही काही लंपट मागे पुढे पाहत नाही, अशा सगळ्यांनी एकदा ही जाहिरात पाहिलीच पाहिजे.

घडी डिर्टजंटने होळीचे औचित्य साधून एका जाहिरात काढली आहे. छेडछाडीवर भाष्य करणारी ही जाहिरात आहे. भांग पिऊन टल्ली झालेल्या मुलांचे टोळकं एका कोप-यात बसलं आहे. एवढ्यात समोरून दोन मुली येतात. साहजिकच मुलीला पाहून तिला थोडा रंग लावू म्हणून टोळक्यातला एक मुलगा पुढे जातो आणि तिला रंगही लावतो यावर ती मुलगी काय उत्तर देते हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ एकदा बघायलाच हवा.

रंगपंचमी हा रंगांचा सण, पण समाजात असेही काही जण असतात की ते या रंगाचा बेरंग करतात. या सगळ्यांसाठी एक संदेश या जाहिरातीतून दिला आहे. तेव्हा पुढच्या आठवड्यात  रंग खेळाल तेव्हा ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत एखाद्या मुलीच्या जवळ जाण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर त्याला नक्की अडवा.

Story img Loader