घरात लहान मुलांनी केलेला पसारा आवरायचा म्हणजे दिवसातले कितीतरी तास फुकट जातात. अनेक पालकांना हा अनुभव आला असेल. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लीप चांगलीच व्हायरल होत आहे. लहान मुलांनी केलेला अस्ताव्यस्त पसारा केवळ पंधरा मिनिटांत आवरू आणि खोली एकदम चकाचक करू असा दावा एका हॉटेलने केला आहे. जयपूरमधल्या इबिज या हॉटेलने हा दावा केला आहे. या हॉटेलमध्ये तीन कर्मचारी असे आहेत की एखाद्या यंत्रमानवाला देखील ते लाजवतील. यासाठी त्यांनी टीव्ही चॅनेलवरचा प्रसिद्ध बालकलाकार अक्षत सिंग याला हॉटेलची खोली दिली आणि पंधरा मिनिटांत शक्य असेल तितका पसारा करण्याची मुभा देखील त्याला दिली. या संधीचा गैरफायदा घेत अक्षतने खोलीत इतका पसरा केला की तो पाहून कोणीही डोक्यावर हात मारला असता. पण पुढच्या पंधरा मिनिटांत अतिशय शांत डोक्याने तेही एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे काम करत या तिघांनी हा पसरा आवरला. यांच्या काम करण्याची गती तुम्ही पाहाल तर आश्चर्यचकित व्हाल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा