आपल्यापैकी अनेकांना समुद्राजवळ वेळ घालवायला आवडते. काही जण संधी मिळताच समुद्रावर पोहोचतात, तर काही किनाऱ्यावरील वाळूवर बसण्याचा आनंद घेतात. समुद्राच्या लाटांच्या आवाजात वेळ कसा जातो कळत नाही. अनेकदा काही लोक आपल्या मित्र परिवारासोबत समुद्रकिनारी मस्ती करतानाही दिसतात. पण कधी कधी ही मजा आपल्या जीवावर बेतू शकते. फ्लोरिडा येथील १७ वर्षीय मायकलसोबत असेच काहीसे घडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायकल त्याच्या काही मित्रांसोबत फ्लोरिडातील समुद्रकिनाऱ्यावर गेला होता. तिथे त्याने मित्रांसोबत खूप मजा केली. यादरम्यान त्याच्या मित्रांनी मायकलला त्याच्या मानेपर्यंत वाळूत गाडले. सर्वजण या सर्व क्षणांचा खूप आनंद घेत होते. पण त्याचे पुढे काय होणार आहे याची मायकेललाही कल्पना नव्हती. काहीवेळानंतर मायकेलला त्याच्या मित्रांनी वाळूत गाडल्यानंतर बाहेर काढले. मायकेल वगळता सर्वजण आपापल्या घरी गेले आणि आराम केला.

मात्र घरी गेल्यानंतर मायकेलला त्रास होऊ लागला. प्रथम त्याच्या शरिरावर खाज सुटली. काही वेळाने त्याच्या अंगावर पुरळ उठू लागले. त्याच्या अंगावर लाल पुरळ कसे आणि का उमटत आहेत हे त्याला समजत नव्हते. या पुरळांमुळे मायकेलला खूप खाज सुटू लागली. जेव्हा वेदना असह्य झाल्या तेव्हा मायकेलला त्याच्या आईने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर धक्कादायक सत्य समोर आलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: भिवंडीत चक्क गटाराच्या पाण्यात धुतले टोमॅटो; किळसवाणा प्रकार पाहून लोक भडकले, म्हणाले एवढे पैसे देऊन…

व्हिडिओमध्ये दिसतंय की, मायकलच्या शरिरात किडे शिरले होते म्हणून त्याला हा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्याच्या शरिरातील किडे वरुनही दिसू लागले. शरिराला फोड आले. व्हिडीओमध्ये असं सांगितलं की, समुद्राच्या किनाऱ्यावर हे किडे लपलेले असतात. कुत्र्याच्या शी मुळे हे मातीत पसरतात. मायकेलला त्याच्या मित्रांनी कपड्यांशिवाय वाळूत पुरले. त्यामुळे त्याच्या शरीरात किडे शिरले होते. त्यामुळे समुद्र किनारी फिरायला जाताना सावधानता आणि काळजी घेण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This teen got hookworms after his friends buried him in the sand at the beach video viral on social media srk