उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्याला आश्चर्यचकित करत राहतात. महिंद्रा ग्रुपच्या चेअरमन आनंद महिंद्रा यांचे ट्विटर हँडल मनोरंजक, प्रेरणादायी आणि विनोदी ट्विट्सने भरलेले आहे. सोशल मीडियावर हटके कल्पनांचं कौतुक करणारे आनंद महिंद्रा सर्वसामान्य लोकांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत. यावेळी त्यांनी एका अनोख्या चहाच्या दुकानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका वृद्धाच्या चहाच्या दुकानाचा आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती लोकांना चहा बलवून देत आहे, मात्र यामध्ये खास बाब ही चहाच्या दुकानात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित सिंग गेल्या ४५ वर्षांपासून दीडशे वर्ष जुन्या वटवृक्षाच्या जाळ्यात बांधलेला ही चहाची टपरी चालवत आहेत. अजित सिंह यांचे हे दुकान पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ आहे. अजित सिंह वर्षानुवर्षे ही चहाची टपरी चालवत आहेत. कुटुंबात माणसे आहेत, कमावतेही आहेत, पण सेवा करण्यासाठी ते वर्षानुवर्षे हे दुकान चालवत आहेत. कोणी पैसे दिले तर ठीक आहे, नाही दिले तरी ठीक आहे. ते सर्वांना चहा देतात.

आनंद महिंद्रा यांनी अजित सिंह यांच्या चहाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. दुकानाचे नाव चाय सेवा का मंदिर आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, मी यापूर्वीही अनेकदा अमृतसरला गेलो आहे. अमृतसरमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, पण पुढच्या वेळी मी सुवर्ण मंदिरासह या चहा सेवेच्या या मंदिराला नक्कीच भेट देईन. त्यांनी पुढे लिहिले आहे की, आपले हृदय हेच कदाचित सर्वात मोठे मंदिर आहे. आनंद महिंद्रा असे अनोखे व्हिडिओ शेअर करत असतात. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: दोन कारची समोरा समोर जोरदार धडक; रस्ता ओलांडणारी तरुणी मध्येच आली अन्…

उद्योगपती आनंद महिंद्रा अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करून लोकांना प्रेरित करत असतात. लोक आनंद महिंद्रा यांच्या पोस्टची वाटच पाहत असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This temple of tea service will also be on anand mahindras amritsar travel list srk
Show comments