थायलंडमधील एका अरबपती उद्योगपतीने आपल्या मुलीच्या लग्नासाठी एका दुर्नामेंटचं (स्वयंवर) आयोजन केलं आहे. यासाठी त्याने तीन अट ठेवल्या आहेत. टुर्नामेंट जिंकणाऱ्या वरासोबत मुलीचं लग्न लावून देतील. इतकंच नाही तर जिंकणाऱ्या मुलाला बक्षीस म्हणून २ कोटी २१ लाख रूपये देणार आहेत. त्यासोबतच अरबो रूपयांचा व्यवसायही मिळेल, असेही बोलले जात आहे.

थायलंडमधील प्रसिद्ध उद्योगपती आरनॉन रोदथोंग आपल्या २६ वर्षीय Karnsita Rodthongचे लग्नासाठी टुर्नामेंट घेत आहेत. आरनॉन हे डूरियन फळाचे व्यापारी आहेत. डूरियन हे फार जास्त दुर्गंधी येणारं फळ आहे. आरनॉन यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. त्यात त्यांनी अटीही सांगितल्या.

आरनॉन यांनी आयोजित केलेल्या टुर्नामेंटसाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. सध्या यामधील अर्जाची तपासणी सुरू आहे. मुलांना डूरियन फळाच्या व्यवसायाची किती माहिती आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे. ही टुर्नामेंट १ एप्रिल रोजी थायलॅंडमधील पटायामध्ये होणार आहे.

 

काय आहेत अटी –
१ ) मुलगा सुंदर असो वा नसो पण सुशिक्षित असावा.
२) मुलगा आळशी नसावा तो मेहनती असायला हवा.
३) मुलाला डूरियन फळाबाबत पूर्ण माहिती असावी.

Story img Loader