आतापर्यंत टीव्हीवर तुम्ही सूपरमॅन, स्पॉयडरमॅन यांना हवेत उडताना किंवा भिंत चढताना पाहिले असाल. पण हे झालेत टीव्हीवरचे काल्पनिक पात्र, असं भितींवर सहज चढणं चित्रपटात दाखवतात तेवढं काही सोपं नसतं. पण या चिमुरड्यासाठी हा प्रकार म्हणजे डाव्या हाताचा मळ. ज्या वयात मुलं धड चालू शकत नाही त्या वयात डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हा चिमुरडा भरभर भितींवर चढतो. अरॅट हौसेनी असं या मुलाचे नाव. याच्या वयावर न गेलेलंच बरं. कारण तो अशा काही करामती करतो की भले भले त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत बसतात. इन्स्टाग्रामवर छोट्या अरॅटतचे काही व्हिडिओ शेअर करण्यात आले. हे व्हि़डिओ अल्पावधितच व्हायरल झाले. यातल्या एका व्हिडिओमध्ये तर दहा फूट उंच अशा भिंतीवर अरॅट एक फटक्यात चढताना दिसत आहे. कोणताही आधार न घेता अरॅट अगदी सहजतेने वर चढला आणि तितक्याच सहजतेने तो खाली देखील उतरला. अरॅटचे आई बाबा दोघेही त्याला वेगवेगळ्या कसरती करण्यासाठी प्रोत्साहन देत होते.
Viral Video : पाहा ३ वर्षाच्या ‘सूपरकिड’ची करामत
हे करून दाखवाच!
Written by लोकसत्ता टीम
First published on: 07-04-2017 at 18:03 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This three year old little boy scaling the wall