तुम्ही प्राण्यांना नेहमी चार पायांवर चालताना पाहिले असेल, पण तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला प्राण्यांसारखे चालताना पाहिले आहे का? जर तुम्हाला एखादा व्यक्ती दोन पायांऐवजी दोन हातांवर आणि दोन पायांवर चालताना दिसला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही म्हणाल की, हे सर्व ती व्यक्ती प्रसिद्धीसाठी करत आहे किंवा त्याला वेड लागले आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण तुर्कीमध्ये एक कुटुंब आहे जे दोन हात आणि दोन पायांचा वापर करून प्राण्यांसारखे चालते. होय.. तुम्ही योग्य तेच वाचत आहात. जगामध्ये असे कुटुंब आहे, जे माणसाप्रमाणे नव्हे तर प्राण्यांसारखे चालते.
दक्षिण-पूर्व तुर्कीमध्ये राहणारे उलास कुटुंब (Ulas Family) प्राण्यांप्रमाणे चालते. त्यांना चालताना पाहिले तर अस्वल चालल्यासारखे वाटते. या आधी कोणीही असे प्राण्यांप्रमाणे चालताना दिसले नाही. या कुटुंबाने जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधकांनाही आश्चर्यचकित केले आहे.
कुटुंबातील बरेच लोक माणसांसारखे चालत नाहीत
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तुर्कीच्या संशोधकांनी त्यांच्यावर एक शोधनिबंध प्रकाशित केला, तेव्हा जगाने उलास कुटुंबाची प्रथम दखल घेतली. कुटुंबातील अनेक सदस्य असे चालतात. Resit Ulas आणि Hatis Ulas यांना १९ मुले होती, त्यापैकी १२ दोन पाय आणि दोन हात वापरून चालतात. या शारीरिक स्थितीला नॉन-प्रोग्रेसिव्ह कॉन्जेनिटल सेरिबेलार ॲटाक्सिया (Non-Progressive Congenital Cerebellar Ataxia) म्हणतात. या मुलांमध्ये बौद्धिक व्यंगही होते. या अवस्थेला बळी पडलेल्यांना माणसांप्रमाणे दोन पायांवर चालण्यास त्रास होत असल्याने त्यांनी दोन पाय आणि दोन हातांचा आधार घेऊन चालण्यास सुरुवात केली.
हे कुटुंब मानवी उत्क्रांतीचा दुवा आहे का?
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर निकोलस हम्फ्रे (Nicholas Humphrey) यांनी सांगितले की, ”आपण दोन पायांवर चालू शकतो आणि आपले डोके उंच ठेवू शकतो, हे आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे बनवते. भाषा आणि इतर गोष्टीही आहेत. उलास कुटुंब हे मानवी उत्क्रांतीच्या (Human Evolution) संक्रमणकालीन टप्प्याचे (Transitional Phase) उत्तर असू शकते.”
हे ‘Backward Evolution’ आहे का?
काही शास्त्रज्ञांनी उलास कुटुंब पाहून ‘Backward Evolution’चा सिद्धांत मांडला. प्रोफेसर हम्फ्रे आणि इतर शास्त्रज्ञांनी हे चुकीचे म्हटले आहे.
लिव्हरपूल विद्यापीठातील संशोधकांनी उलास कुटुंबातील सदस्यांच्या सांगाड्यांवर संशोधन केले. ते सांगतात की, नॉन-प्रोग्रेसिव्ह कॉन्जेनिटल सेरेबेलर ॲटॅक्सिया हे प्राण्यांसारखे चालण्याचे एकमेव कारण नाही. हे सांगाडे माणसांपेक्षा माकडांसारखेच आहेत, त्यांचे सेरेबेलमही आकुंचन पावले आहे, असेही सांगण्यात आले.
तुर्की शास्त्रज्ञांनी आणखी एक गृहितक (hypothesis) मांडले, जे होते ‘डिवोल्यूशन’ (Devolution)’. त्यांच्या प्रस्तावानुसार तीन दशलक्ष वर्षांच्या उत्क्रांतीच्या अनुवांशिक प्रतिगमनामुळे (Genetic regression) हे गुण या कुटुंबात आले असावेत. प्रोफेसर हम्फ्रे यांनी याला ‘शास्त्रज्ञांची बेजबाबदार कृती’ म्हटले आहे. प्रोफेसर हम्फ्रे असेही म्हणाले की, ”या कुटुंबातील लहान मुलांनाही उभे राहण्यास शिकवले जा