आजवर आपण ट्रक आणि मोठ्या वाहनांचे काहीसे युनिक हॉर्न ऐकले असतील. पण बाईकच्या हॉर्नमध्ये फारशी वॅरायटी ऐकायला मिळत नाही, यामुळे रस्त्याने जाता – येता बाईकचे त्याच-त्याच प्रकारचे हॉर्न रोज आपल्या कानावर पडतात. पण काही वेळा मधूनचं एखादा युनिक हॉर्न अचानक कानावर पडतो. जो अनेकांचे लक्ष वेधून घेतो. असाच एक विचित्र बाइकचा हॉर्न सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणे अवघड होऊन बसले आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण इलेक्ट्रिक स्कुटीवरून काहीचा युनिक हॉर्न वाजवत रस्त्याने जात आहे. यावेळी त्याच्या बाजूच्या वाहनावरुन जाणारे तरुण त्याला वारंवार स्कुटीचा हॉर्न वाजून दाखवण्याची विनंती करत करत आहेत. स्कुटीवरून जाणाऱ्या तरुणाने हॉर्न वाजवताच हे तरुण जोरजोरात हसत त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहेत. स्कुटीचा हॉर्न ऐकताच रस्त्यावरील इतर गाड्याही लगेच बाजूला होत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एका ट्विटर युजरने इलेक्ट्रिक स्कुटीच्या युनिक हॉर्नचा व्हिडिओ शेअर केला आहे. या हॉर्नमधून “जल्दी वहां से हटा” असे ऐकू येत आहे. याचा अर्थ ‘लवकर इथून बाजूला व्हा” असे आहे. बाईकच्या अनोख्या हॉर्नचा व्हिडीओ @dakuwithchaku नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल तर असा हॉर्न तुमच्याकडे असायला हवा. अनेकांना स्कुटीचा हा हॉर्न खूप विचित्र वाटला, तर काहींना तो गाडी चालवताना लक्ष विचलित करणारा आणि धोकादायक वाटला.
स्कुटीच्या विचित्र हॉर्नचा व्हिडिओ पहा:
एका ट्विटर युजरने कमेंट करत लिहिले की, मला हा व्हिडिओ खूप आवडला. हा व्हिडीओ इतका छान आहे की, लोक हसत आहेत आणि हीच सर्वात चांगली गोष्ट आहे, असे मला वाटते. दुसर्या एका युजरने म्हटले की, हे खूप मजेदार आहे. याशिवाय आणखी एका युजरने @OlaElectric कडे संबंधित तरुणावर कारवाईची मागणी करत लिहिले की, @OlaElectric ने कृपया या सुविधेचे पुनरावलोकन करा, कारण मी अनेक लोकांना ओला इलेक्ट्रिक वाहनांमधील या सुविधेचा गैरवापर करताना पाहिले आहे.