मोठ मोठ्या सिमेंटच्या पाईपमध्ये हजारो रुपये खर्च करून राहण्याचा विचार तुम्ही कधी केला का ? आपल्याकडे असे मोठमोठाले सिमेंटचे पाईप म्हणजे उपद्रवी प्राण्यांचा अड्डा असतो. सहज दूरच्या प्रवासात या पाईप लाईनवर लक्ष गेले कि तुमच्या लक्षात येईल कि तिथे उपद्रवी प्राण्यांचा वावर तर असतोच पण काही वेळा परिस्थिती नसलेले अनेक गरिब लोक देखील राहण्यासाठी या जागेचा आडोसा घेतात. या पाईप लाईनचा परिसर म्हणजे अत्यंत गलिच्छ असतो त्यात राहणे तर दूर पण काही मिनिटे उभे राहण्याची देखील आपण कल्पना करू शकत नाही.
पण जगाच्या पाठिवर असेही एक ठिकाण आहे जिथे लोक हजारो रुपये खर्च करून या हॉटेलमध्ये राहतात. कदाचित हे ऐकून तुमच्या भुवया उंचावल्या असतील. पण हे खरे आहे. मेक्सिको देशात ‘द ट्युबो हॉटेल’ आहे. पण हे हॉटेल इतर हॉटेल्सपेक्षा खूपच वेगळे आहे. कारण सिमेंटचे पाईप वापरून त्याचे रुपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. मेक्सिको शहरापासून काही तासांच्या अंतरावर हे हॉटेल आहे. हे हॉटेल अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. जरी एका सिमेंटच्या पाईपमध्ये राहण्याची कल्पना आपल्याला थोडी विचित्र वाटत असली तरी ‘द ट्युबो हॉटेल’ अशा प्रकारे सजवले आहे कि ते पाहून हा सिमेंटचा भलामोठा पाईप आहे अशी कल्पनाही कोणाच्या मनाला शिवत नाही. पाईपचे तुकडे एकावर एक रचण्यात आले आहेत. या पाईपच्या तोंडापाशी मोठाली गोलाकार काच लावण्यात आली आहे. यात दोन माणसे अगदी आरामशिर झोपू शकतील असा बेड ही देण्यात आला आहे. तसेच पंखा, लाईट आणि इतरही आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. कोणत्याही ग्राहकाची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी यात घेतली गेली आहे. तसेच ग्राहकाला आपल्या पाईप रुममधून निसर्गरम्य दृष्य दिसेल याची काळजीची यात घेतली आहे. या हॉटेलच्या मालकाने टाकाऊ पासून टिकाऊ ही कल्पना वापरून हे हॉटेल तयार केले आहे असेच म्हणावे लागेल. कारण जे पाईप वापरून हे सुंदर हॉटेल थाटले आहे ते पाईप इथे पडून होते. त्यामुळे त्याचा पूर्नवापर करून आणि छान क्रिएटीव्हीटी वापरून हे हॉटेल साकरण्यात आले आहे. २०१० मध्ये हे हॉटेल सुरु आहे.
सिमेंटच्या पाईपमध्ये थाटले हॉटेल
अनेक पर्यटक हजारो रुपये खर्च करून या पाईपमध्ये राहतात
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 09-09-2016 at 13:03 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This unique hotel in mexico has recycled storm drain pipes as rooms