जगात सर्वात जास्त कोणते प्राणी दिसत असतील, तर कुत्रे…तुम्हाला ते प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक चौकात बघायला मिळतात. कुत्रा हा प्राणी पाळीव प्राणी आहे, जे मोठ्या संख्येनं लोक पाळतात. पण पाणकुत्रे क्वचितच पहायला मिळत असतात. पण हे पाणकुत्रे दिसायला गोंडस असतात. अशा प्राण्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर आले की लगेच व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा एक वेगळा आणि मजेदार व्हिडीओ आहे. तुम्हालाही तो नक्की आवडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा समुद्रकिनाऱ्यावर इकडून तिकडे खेळताना दिसत आहे. तर दुसरीकडे समुद्रात एक पाणकुत्रा अधून मधून डोकावताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या पाळीव कुत्र्यासह समुद्रकिनाऱ्यावर कॅच बॉल खेळत आहे. हे पाहून समुद्रात असलेला पाणकुत्राही उत्सुक होतो आणि या खेळात तो कॅमिओ बनून त्यांच्यासोबत खेळू लागतो. या खेळामध्ये कुत्रा विरूद्ध पाणकुत्रा असा सामना रंगताना दिसतो. हा व्हिडीओ पाहताना या खेळात कुत्रा जिंकतो की पाणकुत्रा हे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असते. तुम्हाला सुद्धा हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली असणारच. तुमची ही उत्सुकता आणखी न वाढवता प्रत्यक्षच हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आणखी वाचा : हिजाब घालून ओणम साजरा करणाऱ्या विद्यार्थिनींचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. हा व्हिडीओ Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर तो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागला आहे की आतापर्यंत या व्हिडीओला १ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर २९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. तसंच ३,४५९ लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केलाय.

आणखी वाचा : हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये हत्ती फिरताना दिसले, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : लाकडी काठ्यांपासून बनवला बुलडोझर, विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “लँड डॉग विरुद्ध सी डॉग.” दुसर्‍या यूजरने लिहिले की, “प्राणी जीवनात असा आनंद आणतात.” तिसऱ्या यूजरने लिहिले की, “हे ट्विट ऑफ द डे अवॉर्ड जिंकतं. माझ्याकडे असा कुत्रा असायचा. त्याला पाण्यात राहायचे होते…असो.”