जुगाड म्हंटलं की सगळ्यात पहिलं नाव येतं ते भारतीयांचं. कारण, भारतीयांचा हात जुगाडामध्ये कोणीच पकडू शकत नाही. कोही लोकांचे जुगाड इतके भारी असतात की, तुम्हाला तो पाहून धक्काच बसेल. तर काही जुगाड पाहून लोकांना त्या व्यक्तीची प्रशांसा करायला भाग पाडते ज्याने हा जुगाड केला आहे. तेव्हा लोकांच्या मनात असा देखील विचार येत असतो की, असं आम्हाला का नाही सुचलं? असाच लोकांना विचार करायला लावणारा जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही देखील या जुगाडाच्या प्रेमात पडाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असं म्हणतात प्रत्येक ठिकाणी देव येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला बनवलं. परिस्थितीती कशीही असू देत, पण आई आपल्या लेकरांना कधी त्रास होऊ देत नाही. आपल्या लेकराची काळजी घेतच ती तिचं संपूर्ण आयुष्य काढत असते. अशाच एका आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या आईला सायकलवरून दूर प्रवास करायचा होता. पण तिला आपल्या लेकराची चिंता होती. सायकलवर मागे बसल्यानंतर खेळता खेळता आपला मुलगा पडला तर याची चिंता तिला सतावत होती. त्यावेळी या आईने एक जुगाड शोधून काढला. याचा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण या आईला ‘सुपरमॉम’ म्हणाताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : सायकल चालवता चालवता गोरिला धापकन खाली पडला, रागात त्याने काय केलं? पाहा VIRAL VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला सायकल चालवतेय. पण सायकलची मागची सीट पाहिल्यानंतर लक्षात येतं की, या आईला आपल्या लेकराची किती चिंता आहे. तुम्ही पाहू शकता की, सायकलच्या मागच्या सीटवर एक लहान मुलगा अगदी आरामात बसलाय. सायकलवरचा हा प्रवास कितीही दूरचा असू देत, आता या आईला तिच्या लेकराची चिंता नाही. हा मुलगा मागच्या मागे पडून जाईल, याची भीती देखील या व्हिडीओमधल्या आईला नाही. हा व्हिडीओ पाहून लोक आईने वापरलेल्या जुगाडचं कौतुक करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अभिनेता वरुण धवनच्या पंजाबी गाण्यावर थिरकल्या ६३ वर्षीय ‘Dancing Dadi’

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO: डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत मोबाईल हिसकावला, ट्रेनच्या दरवाज्यावर बसण्याचा शहाणपणा नडला

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ एक दिवसा अगोदर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर बघता बघता हा सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत १.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५३.९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This video of a woman riding a bicycle with her toddler is going viral here why supermom desi jugaad prp