Viral Video: एखाद्या नवीन ठिकाणी स्थलांतर करताना किंवा दुकानातून एखादी नवीन वस्तू खरेदी करून घेऊन येताना त्या सामानाची काळजीपूर्वक ने-आण करावी लागते. त्यातच बेड, कपाट, काचेच्या वस्तू, सोफा व्यवस्थित पॅक करून टेम्पो किंवा पॅकबंद वाहनातून घेऊन जाव्या लागतात. कारण- त्या मौल्यवान आणि जड असतात. पण, आज सोशल मीडियावर काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं आहे. काही तरुण इलेक्ट्रिक स्कूटरवरून सामान घेऊन जाताना दिसले आहेत. व्हायरल व्हिडीओ परदेशातला असला तरीही तरुणांची ही युक्ती पाहून तुम्ही याला ‘जुगाड’ म्हणाल एवढं नक्की.

व्हायरल व्हिडीओ अमेरिकेचा आहे. दोन तरुण इलेक्ट्रिक स्कूटरवरून येतात. त्यांना रस्त्याच्या कडेला ठेवलेला एक सोफा स्वतःबरोबर घेऊन जायचा असतो. पण, एवढा मोठा सोफा घेऊन कसा जायचा, असा प्रश्न त्यांना पडतो. कारण – त्यांच्याकडे फक्त दोन इलेक्ट्रिक स्कूटर असतात. पण, दोघे तरुण एक जबरदस्त जुगाड शोधून काढतात. दोघेही त्यांच्या स्कूटरवर सोफ्याच्या दोन्ही कडा उचलून ठेवतात. पुढे नक्की काय घडलं? तरुणांनी नक्की काय जुगाड केला एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा पाहा.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

हेही वाचा…मालकाने घेतला सराव, मांजरीला फसवण्यासाठी त्याने रचला डाव; VIDEO पाहून म्हणाल… ‘हुश्शार श्वान’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरवर सोफ्याच्या दोन्ही कडा उचलून ठेवल्या आहेत. त्यानंतर तरुण पाय ठेवण्यासाठी थोडी जागा करतात. दोघेही आपापल्या इलेक्ट्रिक स्कूटरवर उभे राहतात आणि स्कूटर चालवीत सोफा अगदी व्यवस्थित घेऊन जातात. भलामोठा सोफा दोन इलेक्ट्रिक स्कूटरवरून अगदी सहज नेला जातो आहे. कोणाचीही मदत न घेता, कुठेही तोल न जाता हा सोफा थेट इलेक्ट्रिक स्कूटरवरून घेऊन जाण्यात तरुण यशस्वी ठरले आहेत; जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @lyricaanderson या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रसिद्ध अमेरिकन R&B गायिका व गीतकार लिरिका अँडरसननं हे दृश्य तिच्या परिसरात पाहिलं आणि याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे आणि ‘दोन्ही तरुण स्कूटरवरून सोफा घेऊन जात आहेत… छान काम मित्रांनो!’, अशी कॅप्शन देत व्हिडीओ पोस्ट केला. अनेक भारतीय नागरिकांना हा व्हिडीओ पाहून भारतीयांच्या देसी जुगाडची आठवण झाली आहे आणि ते विविध शब्दांत कमेंटमध्ये प्रतिक्रिया मांडताना दिसून येत आहेत.

Story img Loader