चावून हैराण करणारे डास आणि त्यांना मारायला हात पुढे आले की नाना पाटेकर यांचा ‘एक मश्चर आदमीको…. ‘हा डायलॉग आठवल्याशिवाय राहत नाही. खरे आहे म्हणा ! डेंग्यू, मलेरिया झाले की धडधाकड माणूससुद्धा अंथरूणावर खिळतो. पावसात तर यांचा उपद्रव अधिकच. त्यामुळे नको ती रोगांची साथ त्यापेक्षा आधीच यांचा बंदोबस्त केलेला बरा असे म्हणत अनेक जण उपाय शोधत असतो. कोणी बाजारातून डासांना दूर ठेवण्यासाठी कॉइल, लोशन वगैरे आणतो. दुसरीकडे पालिकेच्या इतर उपाययोजना सुरू असतातच म्हणा. याव्यतिरिक्त कडुनिंबाचा पाला जाळणे, इलेक्ट्रीक बॅट आणून डासांना जाळून टाकणे असे प्रकार घरोघरी सुरू असतात ते वेगळेच. पण डासांचा बंदोबस्त करण्याचा एक रामबाण उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत ९८ लाखांहूनही अधिक लोकांनी हा उपाय कसा करायचा याचे प्रात्यक्षिक पाहिले आहे. ‘एसएफ ग्लोबल’चा हा व्हिडिओ आहे. यात एक प्लॅस्टिकची बाटली, चमचाभर ब्राऊन शुगर, पाणी आणि यीस्ट या चार गोष्टी तुमची डासांपासून कशी सुटका करून देऊ शकतात हे दाखवले आहे. या उपायामुळे डास आपोआप यात अडकले जातील असा दावा त्यांनी केला आहे.
काय आहे उपाय
दोन लीटर पाण्याची क्षमता असलेली प्लॅस्टिकची बाटली मधोमध कापयाची. यात पाणी, ब्राऊन शुगर आणि यीस्ट यांचे मिश्रण ओतायचे. बाटलीचा तोंडाकडील कापलेला भाग हा उलटा करून या मिश्रणात ठेवायचा. ही बाटली ज्या ठिकाणी डास आहेत त्या ठिकाणी ठेवायची, त्यामुळे यात डास फसले जातील. हा उपाय कितपत डासांपासून सुटका करून देतो माहित नाही पण व्हिडिओ पाहणा-यांची संख्या लक्षात घेता हा रामबाण उपाय आपली जादू दाखवतो आहे असेच दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा