Woman Earn 4 Lahks In 3 Hours Viral Post : महिनाभर काम केल्यानंतर कुठे शेवटी हातात पगार येतो. अशा वेळी हातात मिळालेल्या पगाराने अनेकांचे तितकेसे समाधान होत नाही. जर तुम्हीही ८-९ तासांची नोकरी करून कंटाळले असाल किंवा मिळालेल्या पगारात समाधानी नसाल, तर ही व्हायरल पोस्ट एकदा नक्की वाचाच, कारण- यात एका तरुणीने चक्क तीन तासांत चक्क चार लाखांपेक्षा अधिक रकमेची कमाई केली आहे. त्यामुळे तिच्या कमाईची आता सर्वत्र चर्चा रंगतेय. पण, या तरुणीने इतक्या कमी वेळात एवढे पैसे कसे कमावले ते जाणून घेऊ…

श्वेता कुकरेजा नावाच्या एका युजरने एक्सवर एक पोस्ट केली आहे, जी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमध्ये तिने बँक अकाउंटमध्ये क्रेडिट झालेल्या पैशांचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिच्या अकाउंटमध्ये चार लाख ४० हजार रुपये क्रेडिट झालेले दिसत आहेत. केवळ तीन तास काम करून मला चार लाख रुपये (५,२०० डॉलर्स) मिळाले आहेत. मला फक्त त्यांच्या सोशल मीडिया स्ट्रॅटेजीवर काम करायचं होतं, असे तिचे म्हणणे आहे.

पाठीमागून मृत्यू आला अन्…; रस्त्यावरील थरारक अपघात, VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कोणाची?

कुकरेजा हिने पोस्टमध्ये म्हटले की, या महिन्यात मला एका क्लायंटकडून तीन तासांच्या कामासाठी ४,४०,००० रुपये (५,२०० डॉलर्स) मिळाले. मी सोशल मीडिया स्ट्रॅटेजीवर फक्त तीन तास काम केले. नक्कीच असे दिवस कामाला अधिक समाधान देतात आणि त्यामुळे मेहनतीचे खरे मूल्य दिसून येते.

माझ्या कामाचं शुल्क माझ्या कौशल्यावर आधारित आहे; मी काम केलेल्या तीन तासांवर नाही. बऱ्याच वर्षांच्या अनुभवानंतर, क्लायंट माझ्या वेळेपेक्षा माझ्या कौशल्यासाठी पैसे देतात हे लक्षात आलेय. त्यांनी फक्त तासांच्या हिशेबाने पैसे दिले असते, तर ही रक्कम खूपच छोटी असती.

फक्त व्हायरल होण्यासाठी हा एक हॅकिंगचा प्रकार‘, लोकांच्या प्रतिक्रिया

कुकरेजाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक युजर्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. काही लोक तिचे कामाचे शुल्क ऐकूनच अवाक् झाले आहेत. इतकेच नाही, तर काही लोक म्हणू लागले की, हा फक्त व्हायरल होण्यासाठी एक हॅकिंगचा प्रकार आहे.

एका युजरने लिहिले, “हे एका फ्रेशरच्या सीटीसीपेक्षा जास्त आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “हे पैसे फक्त ३ तासांसाठी नाहीत, तर तुमच्या कौशल्यासाठी मिळाले आहेत, ज्यासाठी तुम्ही आयुष्यभर मेहनत घेतली आहे.

रिपोर्टनुसार, श्वेता कुकरेजा ही एक सोशल मीडिया एक्स्पर्ट आहे, क्लायंट्सचे पर्सनल ब्रॅण्डिंग सुधारण्याचे काम ती करते. परंतु, तिला या कामासाठी मिळणाऱ्या मोबदल्याच्या पैशाचा आकडा ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.