जागतिक महामारी कोरोनामुळे जगभरातील अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. शिवाय या महामारीमुळे जगाचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले. पण ही महामारी चीममुळे जगभर पसरल्याचा दावा आजही केला जातो. कोरोनासाठी अनेक देश चीनला जबाबदार धरतात. कारण कोरोनाची सुरुवात ही चीनमधूनच झाली होती. शिवाय चीनमधील लोक कोणतेही प्राणी खातात त्यामुळेच असे आजार पसरतात असंही म्हटलं जातं. चीनमधील लोक विविध प्राण्यांना खातानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकांना किळस येतो. असे व्हिडीओ तुम्हीही पाहिले असतील, यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या सोशल मीडियावर असाच एक अत्यंत किळसवाना आणि तितकाच भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसू शकतो. कारण व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक महिला बोकडाचे किंवा कोंबडीचे नव्हे तर चक्क भल्यामोठ्या अजगराचे मांस रस्त्याच्या कडेला विकताना दिसत आहे. महिलेने रस्त्याच्या कडेला अजगराचे मांस विकण्यासाठी स्टॉल लावल्याचं व्हिडिओत दिसत आहे. यावेळी काही लोक तिच्याकडून मांस खरेदी करण्याठी येत असल्याचंही पाहायला मिळत आहे. व्हिडीओतील महिला एका अजगराच्या शरीराचे मोठे तुकडे करुन ते ग्राहकांना देत असल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला आहे. शिवाय काही नेटकऱ्यांनी, आता माणसं कोणत्याच प्राण्याला खायचं सोडत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

व्हिडिओ पाहून घाबरले नेटकरी

रस्त्याकडेला अजगराचे मांस विकणाऱ्या महिलेचा व्हिडिओ जितका किळसवाना आहे तितकाच धक्कादायक आहे. हा व्हिडीओ चीनमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी घाबरल्याचंही पाहायला मिळत आहे. अनेकांनी माणसं अजगर खाऊ शकतात यावर विश्वास बसत नसल्याचं म्हटलं आहे. तर काही लोकांनी, “हे खूप भयावह दृश्य आहे” अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी “कृपया माणसांपासून प्राण्यांना वाचवा” असंही लिहिलं आहे.