दिवाळी हा सगळीकडे आनंद घेऊन येणारा सण. लहान मुलांपासून जेष्ठ मंडळींपर्यंत अनेकांचा हा आवडता सण. नवीन गाडी घेण्यापासून नव्या कामाची सुरूवात करण्यासाठी दिवाळीतील शुभ मुहूर्त निवडला जातो. वर्षातील या सर्वात मोठ्या सणाच्या आपल्या प्रियजणांना खास पद्धतीने शुभेच्छा द्याव्या असे सर्वांनाच वाटते. यासाठी बरेचजण ग्रीटिंग कार्ड देण्याचा पर्याय निवडतात. वेगवेगळ्या डिझाईनचे आकर्षक ग्रीटिंग कार्ड दिवाळीच्या काही दिवसांआधीच बाजारात उपलब्ध होतात. पण जर एखाद्यावेळी ग्रीटिंग कार्ड उपलब्ध नसतील तर शुभेच्छा कशा द्यायच्या असा प्रश्न पडू शकतो. हाच प्रश्न लॉकडाउन दरम्यान शिवानी शर्मा या तरुणीला पडला आणि तिने त्यावर काय उपाय शोधून काढला पाहा.
लॉकडाउनमध्ये जवळच्या नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी टोरंटो इथे राहणाऱ्या शिवानी शर्मा या तरुणीला ग्रीटिंग कार्ड्स हवे होते. त्यासाठी तिने शहरात सगळीकडे शोध घेतला पण तिला ग्रीटिंग कार्ड्स मिळाले नाहीत. यावरुन तिला निराश झालेले पाहून तिच्या पतीने तिला स्वतःच कार्ड बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि तिने ते मनावर घेत थेट ग्रीटिंग कार्डचा नवा व्यवसाय सुरू केला.
आणखी वाचा : रोज सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो का? ‘या’ सवयी ठरतात कारण; लगेच करा बदल
लॉकडाउनमधील गैरसोयीमुळे नव्या व्यवसायाची कल्पना सुचली
कुटुंबातील सदस्यांनीही शिवानी शर्माला नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि तिने ‘मुबारक कार्डस’ हा नवा व्यवसाय सूरू केला. लॉकडाउनमध्ये अनेक गोष्टींबाबत गैरसोय झाली असे तुम्ही अनेकजणांना बोलताना ऐकले असेल, पण येणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढत नवा व्यवसाय सुरू करण्यासारखा विचार प्रेरणा देणारा आहे.