सोशल मिडीयावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. फेसबुकपासून इंस्टाग्राम आणि ट्विटरपर्यंत, अशा सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात. कधीकधी मजेदार व्हिडीओ लोकांना हसवतात तर काही व्हिडीओ लोकांना आश्चर्यचकित करतात आणि काही व्हिडीओ असेही असतात जे पाहून लोक भावूक होतात. आजकाल असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. हा व्हिडीओ एका पेंटिंगशी संबंधित आहे. तुम्ही बऱ्याच पेंटिंग पाहिल्या असतील, पण ‘वय’ सांगणारी अशी पेंटिंग तुम्ही याआधी नक्कीच पाहिली नसेल. होय, ही वय सांगणारी सुंदर चित्रकला आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल होत असलेला पेंटिंगचा व्हिडीओ एकदा पहाच.
वास्तविक हे पेंटिंग अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, एका बाजूने पाहिल्यास स्त्री तरुण दिसते आणि दुसऱ्या बाजूने पाहिल्यास स्त्री लगेच वृद्ध होते. ही चित्रकला तरुणपणापासून ते वृद्धापकाळापर्यंतची संपूर्ण कथा सांगते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका सुंदर मुलीचे पेंटिंग आहे, जे तुम्ही एका बाजूने पाहिले किंवा समोरून पाहिले तर ती मुलगी तरुण दिसते, परंतु तुम्ही पेंटिंगच्या दुसऱ्या बाजूला जाताच, त्या स्त्रीचे वय वृद्ध दिसू लागते. चेहऱ्यावर खूप सुरकुत्या दिसू लागतात आणि अशा स्थितीत संपूर्ण चेहराच बदलून जातो. अशी पेंटिंग तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली नसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.
( हे ही वाचा: जपानमध्ये सापडला लाखो वर्षे जुना रहस्यमय प्राणी! हा VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल)
( हे ही वाचा: VIRAL VIDEO : कुत्रा आणि साप यांच्यातील भयानक झुंज तुम्ही पाहिली आहे का? पहा हा व्हायरल व्हिडीओ)
तरुणपणापासून म्हातारपणाची कहाणी सांगणाऱ्या या पेंटिंगचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @ValaAfshar नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या १९ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ३.६ दशलक्ष म्हणजेच ३६ लाख वेळा पाहिला गेला आहे, तर ६५ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक या पेंटिंगला प्रेक्षणीय म्हणत आहेत.