जेव्हा आपण आनंदी असतो, तेव्हा अनेकदा आपण आपल्या प्रियजनांना मिठी मारतो. परंतु जेव्हा आपण दुःखी आणि अस्वस्थ असतो तेव्हा देखील आपल्याला अशा व्यक्तीची गरज असते जिला आपण मिठी मारून आपले सर्व दुःख आणि त्रास विसरून जाऊ इच्छितो. एखाद्याला मिठी मारणे, ही केवळ आपली इच्छा नसून ही शरीराची एक गरज आहे. मिठी मारल्याने मनातील उदासीनता तर दूर होतेच पण अनेक आजारही दूर होतात. याशिवाय मिठी मारण्याचे इतर अनेक फायदे आहेत. पण एखादी व्यक्ती कुणाला मिठी मारून लाखो रुपये कमवते, असे तुम्हाला सांगितले तर? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण प्रोफेशनल डॉक्टर्स, इंजिनियर्स शिवाय प्रोफेशनल कडलर पण आहेत.
ब्रिटनच्या ब्रिस्टल शहरात राहणारा ३० वर्षीय ट्रेवर हूटन, त्रासलेल्या आणि दुःखी लोकांना मिठी मारून शांत करतो. यासाठी तो लोकांकडून ७५ पाउंड्स म्हणजेच जवळपास ७ हजार रुपये आकारतो. ट्रेव्हर जे काम करतो त्याला ‘कडल थेरपी’ म्हणतात. या थेरपीमध्ये लोकांना आलिंगन देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो.
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये वाळत घातले कपडे; Viral Video ने इंटरनेटवर घातला धुमाकूळ
मिरर या इंग्रजी वेबसाइटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हूटनने काही महिन्यांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला आहे. याशिवाय, हूटन ‘कनेक्शन कोचिंग’ सारख्या सेवा देखील देतो आणि इतरांशी संपर्क साधण्यासाठी संघर्ष करत असलेल्या लोकांना मदत करतो. हूटन दुःखी आणि व्यथित लोकांना भावनिक आधार प्रदान करतो. या दरम्यान, तो त्यांना मिठी मारून त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो.
मीडियाशी बोलताना हूटन म्हणाला की, त्यांचे काम लोकांना वाटते तितके सोपे नाही. यासाठी तुमच्या स्पर्शात ती क्षमता असली पाहिजे. जेव्हा मी एखाद्याला मिठी मारतो तेव्हा लोकांना असे वाटते की त्यांच्या दुःखाच्या वेळी कोणीतरी त्यांच्यासोबत आहे. मात्र, त्याच्या कामाबाबत अनेकदा गैरसमज होतो, काही लोकांना हे सेक्स वर्क वाटते, पण त्याला या गोष्टीची काहीच हरकत नसल्याचे तो सांगतो.