सोशल मिडिया आपल्या रोजच्या जीवनातील भाग झाला आहे. आज प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करत आहे. सोशल मीडियावर मनोरंजनाचे अनेक पर्याय सहज उपलब्ध असतात. १५ ते ३० सेकांदाचे मनोरंजक व्हिडिओ दर्शवणारे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. हे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे त्यामुळे व्हिडिओ कॉन्टेंट तयार करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. एका पेक्षा एक कॅमेरा क्वालिटी असलेले मोबाईल बाजारात सहज मिळत असल्याने व्हिडिओ करणे फारसे अवघड राहिलेले नाही त्यामुळे कोणीही व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. यातून काही चांगले कॉन्टेट क्रिएटर पैसे देखील कमावतात. सोशल मीडियावर काही लाईक्स, शेअर आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी अनेकजण काहीही व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करतात ज्याला काही अर्थच नसतो. अनेकदा हे व्हिडीओ शुट करण्याच्या नादात काहीजण स्वत:चा किंवा इतरांचा जीव धोक्यात टाकतात. सोशल मीडियावर असे कित्येक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. सध्या अशाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये एका तरुणीने रील व्हिडिओ शुट करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक तरुणी थेट गॅसच्या ओट्यावर बसून रिल व्हिडिओ शुट करत आहे तेही गॅस चालू ठेवून. शुटींग सुरू करण्यासाठी तरुणीने मोबाईलच्या दिशेला जाते आणि शुटींग सुरू करते. त्याचक्षणी तिची ओढणी चालू गॅसवर पडते आणि पेट घेते. तरुणीच्या लक्षात येताच ती ओढणी अंगावरून काढून खाली फेकून देते आणि ओट्यावरून खाली उतरते आणि ओढणीला लागलेली आग शमविण्याचा प्रयत्न करते. काही वेळाने तरुणी गॅस बंद करताना दिसते.
व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रथम असे वाटते की रील शुट करताना चुकून अपघात घडला पण इंस्टाग्राम खात्यावर पेजवर अशाच पद्धतीचे आणखी व्हिडिओ दिसत आहे. आणखी एका व्हिडिओ ही तरुणी अशाच प्रकारे ओढणी जाळताना दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडीओवमध्ये ती गॅसवर ठेवलेले गरम पाणी सांडताना दिसते.
चालू गॅस शेजारी बसून व्हिडिओ शुट करणारी ही तरुणी स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहे. हे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने ही तरुणी प्रसिद्धीसाठी असे व्हिडिओ करत असल्याचा दावा केला आहे. व्हिडिओ _sapana_singh88 नावाच्या इंस्टाग्राम खात्यावर पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तरुणीवर टिका केल्या आहेत.
एकाने कमेंट केली की, “मला समजत नाही अशा व्हिडीओला लाइक कोण करते”
दुसऱ्याने कमेंट केली की, रोज किती गॅस वाया घालवता, तुमच्या घरातले काही बोलत नाही का, त्यांनाही वाटत असेल ती तु वेडी आहे”
तिसऱ्याने कमेंट केली की, “व्हिडीओच्या नादात जळाली असती”
चौथ्याने कमेंट केली, अग व्हिडीओच्या नादात मेली असतीस, लोक म्हणाले असते की, घरच्यांनी जाळून मारले”