युट्यूबवरच्या प्रसिद्ध व्हिडिओ ब्लॉगर युगेनिया कॉनीला हिला युट्यूबवर तात्पुरतं ब्लॉक करण्याची मागणी सध्या सोशल मीडियावर होत आहे. तिला ब्लॉक करण्यासाठी हजारो लोकांनी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. युगेनिया प्रमाणापेक्षाही अधिक बारिक आहे त्यामुळे त्यामुळे तिचा आदर्श घेऊन इतर मुलीही बारिक होण्याचा प्रयत्न करतात असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे त्यामुळे तिला हटवण्यासाठी एका वेबसाईटवर ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली आहे. २२ वर्षांची युगेनिया ही कपडे आणि मेकअप टिप्स देणारा व्हिडिओ ब्लॉग चालवते. ती तरुणांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे युट्यूबवर तिचे ८ लाख ९० हजार फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाख ३२ हजार फॉलोअर्स आहे. पण आता तिच्याविरोधात एक मोठे जनमत तयार होत आहे. त्यामुळे तिला युट्यूबवर ब्लॉक करण्यासाठी सध्या जोरदार मोहिम सुरू आहे. युगेनिया ही प्रमाणापेक्षा अधिक बारिक आहे त्यामुळे तिला फॉलो करणा-या अनेक तरुणींवर याचा वाईट परिणाम होत आहे. त्या देखील तिच्याइतक्याच बारिक होण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे त्यामुळे जवळपास ९ हजार लोकांनी तिच्याविरोधात ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.

तिने काही दिवसांची सुट्टी घ्यावी आणि उरलेल्या वेळात आपले वजन वाढवून प्रकृती सुधारावी असा सल्ला तिला अनेकांनी दिला आहे. पण आपण कोणालाही वजन घटवण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सल्ला दिला नसल्याचे तिने म्हटले आहे. आतापर्यंत मी केलेल्या कोणत्याच व्हिडिओमध्ये लोकांना बारिक होण्याचा सल्ला दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तिने स्व:ताची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी तिच्याविरोधात इंटरनेटवर सुरु असलेल वादळ अधिकच तीव्र आहे त्यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत आली आहे.

Story img Loader