माणसांना आणि प्राण्यांना मृत्यूच्या दारात ओढवणारे बिषारी साप रानावनात, कधी घराच्या अंगणात. तर कधी शेतात फिरताना दिसत असतात. बिनविषारी सापांना पकडण्यासाठी अनेकांची हिंमत होते. पण विषारी साप समोर दिसला की, पळता भूई झाल्याशिवाय राहत नाही. तसंच अजगरासारखा भलामोठा साप समोर आल्यावरही अंगावर काटे उभे राहतात. विषारी सापाच्या दंशाने माणसाचा मृत्यू होतो, त्यामुळे अशा जातींचे साप घातकच असतात, पण अजगरासारखा भलामोठा सापही माणसावर हल्ला करून त्याला मृत्यूच्या दारात ओढत नेतो. अजगर सापाने अनेक प्राण्यांचीही शिकार केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अजगर सापाने एका बकरीला मृत्यूच्या दारात ओढत नेल्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय घडलं नेमकं?

बकरी शेताच्या परिसरात चरत असताना अचानक भल्या मोठ्या अजगर सापने तिच्यावर हल्ला चढवला. या अजगर सापाने बकरीला पिळ देऊन शेतात ओढत नेले. त्यानंतर अजगराच्या विळख्यात सापडलेल्या बकरीने जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु, अजगराच्या तावडीतून सुटका करण्यात बकरीला अपयश आलं. पंरतु, ही थरारक घटना त्या ठिकाणी असलेल्या तीन मुलांच्या निदर्शनात येते. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता जीवाची बाजी लावत ही मुलं बकरीला मृत्यूच्या दारातून सुखरूप सोडवतात. हा संपूर्ण थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

शेतात काही बकऱ्या चरत असतात, त्यावेळी एका विशाल अजगाराने एका बकरीवर हल्ला केला. अजगराने बकरीला जखडल्यानंतर जीव वाचवण्यासाठी ती बकरी प्रयत्नांची पराकाष्टा करते. पण तिच्या प्रयत्नांना काही यश मिळत नाही. अखेर त्या ठिकाणी असलेल्या मुलांनी हिंमत करून बकरीला अजगराच्या विळख्यातून सोडवले. एवढ्या मोठ्या अजगराला पकडण्यात त्या मुलांना जराही भीती वाटली नाही.

आणखी वाचा – Video: खोल विहिरीत पडला भलामोठा हत्ती; बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली भन्नाट शक्कल

हा थरारक व्हिडीओ फेसबुकवर Waje नावाच्या युजरने शेअर केला आहे. युजरने कॅप्शन मध्ये म्हटलं की, गावातील मुलांनी बकरीला अजगराच्या विळख्यातून सुखरूप सोडवलं. या व्हिडीओला आतापर्यंत 60 मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर पाच लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तसेच शेकडो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षावही केला आहे.