पासपोर्टवरच्या फोटोशी चेहरा मिळता जुळता नसल्याने चीनमधल्या तीन महिलांना कोरियन अधिकाऱ्यांनी विमानतळावरच रोखून धरलं. सुजलेला चेहरा आणि त्यावर पट्टी बांधलेल्या या महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तिन्ही महिलांनी प्लॅस्टिक सर्जरी केली होती. सध्या चीनमध्ये ‘गोल्डन वीक’ सुरू आहे. या काळात चीनमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. लाखो लोक सुट्टीवर असतात, त्यामुळे सुट्ट्या व्यतित करण्यासाठी त्यांना चीनमध्ये यायचे होते, पण यावर पूर्णपणे पाणी फेरले. कारण प्लॅस्टिक सर्जरीमुळे त्यांचा चेहरा इतका बदलला होता की पासपोर्टवरचा फोटो आणि प्रत्यक्षात खूपच अंतर होतं. त्यामुळे दक्षिण कोरियाच्या इमिग्रंट अधिकाऱ्यांनी त्यांना विमानतळावरच रोखून धरलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : रशियन पर्यटकावर आली मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ, सुषमा स्वराज आल्या मदतीसाठी धावून

त्यांच्याकडे प्रवासासाठी लागणारी सर्व कागदपत्रं होती तरीही त्यांना केवळ या कारणामुळे रोखण्यात आलं. सुजलेल्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर पट्टी बांधलेल्या या तीन महिलांनी विमानतळावरील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांचे फोटो चीनच नाही तर इतर देशांतील सोशल मीडियावरही व्हायरल होताना दिसत आहेत. पासपोर्टवर असणारी व्यक्ती आपणच आहोत हे सिद्ध करण्यासाठी या तिघींनीही खूप प्रयत्न केले. या महिलांची मुक्तता कधी झाली हे समजू शकलं नाही. प्लॅस्टिक सर्जरीसाठी दक्षिण कोरियाला चिनी महिलांची विशेष प्रसिद्धी असते. प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी हा देश ओळखला जातो. प्लॅस्टिक सर्जरी करून झाल्यानंतर महिलांना विशेष ऑफरही देण्यात येते, त्यामुळे दरवर्षी हजारो महिला प्लॅस्टिक सर्जरीसाठी या देशात जातात.

वाचा : एक युक्ती; १६६ फोन आणि अॅमेझॉनला त्याने घातला लाखोंचा गंडा