भारतातील जंगले विविध नैसर्गिक चमत्कारांनी भरलेली आहेत. इथे तुम्हाला अनेकदा अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्याचा तुम्ही कधी विचार केलेला नसतो. आपण अनेकदा जंगलात अशी विलक्षण दृश्य पाहतो. असाच एक महाराष्ट्राच्या जंगलात तीन कोब्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे फोटोमध्ये?

एका झाडावर तीन मोठे कोब्रा साप एकमेकांभोवती कसे गुंडाळलेले आहेत हे फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. फोटोमध्ये ते एकमेकांना चिकटून बसलेले दिसतात, तर कधी फणा काढून उभे राहतात.

( हे ही वाचा: इजिप्तमध्ये सापडले ४,५०० वर्षे जुने सूर्यमंदिर; ५० वर्षांतील सर्वात मोठे यश )

दुसरीकडे, कोब्राचा हा दुर्मिळ फोटो लोक खूप शेअर करत आहेत. खरे तर देशात गडद काळा कोब्रा क्वचितच दिसतो, असे सर्प तज्ज्ञांचे मत आहे. असं असलं तरी मेळघाटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की त्यांना असे काळे कोब्रा अनेकदा पाहायला मिळतात, पण तीन नाग एकत्र दिसणे अत्यंत दुर्मिळ आहे.

( हे ही वाचा: अबब! माशाने गिळला १ मीटर लांबीचा साप; हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच )

काल भारतीय वन्यजीव नावाच्या फेसबुक ग्रुपवर कोब्राचे हा फोटो पहिल्यांदा शेअर करण्यात आले होते. सापांची सुटका करून त्यांना जंगलात सोडल्यानंतर हे छायाचित्र क्लिक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, राजेंद्र सेमलकर नावाच्या वापरकर्त्याने या फोटोंची संपूर्ण मालिका सोशल मीडियावर पोस्ट केली, ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील हरिसाल जंगलात झाडाच्या खोडाभोवती तीन नाग गुंडाळलेले दिसत आहेत.हे शेअर करताना सेमाळकर यांनी लिहिले, “जादुई मेळघाट, हरिसालच्या जंगलात दिसले ३ कोब्रा!” त्याच वेळी, आतापर्यंत ५,०००हून अधिक वापरकर्त्यांनी या पोस्टला लाईक केले आहे.त्यातील एक फोटो IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three cobra snakes together rare photo viral in melghat forest ttg