जगात असे अनेक प्राणी आहेत जे एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. त्यांच्यात कधी मैत्री होऊ शकते, असा आपण विचारही करू शकत नाही. त्यात गाय आणि कुत्रा या दोन भिन्न स्वभावाच्या प्राण्यांची आपण कधी कल्पना केली नसेल; पण नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओत हे दोन्ही प्राणी जिवाभावाचे मित्र असल्याचे वाटत आहेत; ज्यात तीन गाई आणि एक कुत्र्याचे पिल्लू दिसत आहे. यावेळी तिन्ही गाई कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या वासराप्रमाणे चाटत आहेत. यावेळी कुत्र्याचे पिल्लू स्वभावाप्रमाणे त्यांच्यावर भुंकत नाही किंवा शेपूट हलवतानाही दिसत नाही. हे पाहून बहुतेक युजर्सनी हे प्राण्यांमधील प्रेम असल्याचे म्हटले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तीन काळ्या-पांढऱ्या रंगाच्या गाई एका काळ्या-पांढऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला चाटताना दिसत आहेत. गाईंचे असे वागणे पाहून पिल्लूही खूप गोंधळते. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्याला काय सुरू आहे हे समजत नसल्याचे दिसून येत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, त्यांना वाटले तो त्यांचा बछडा आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक युजर्सनी पाहिला. तर अनेक युजर्सनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, प्राण्यांवर प्रेम. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, मला हेच समजले की, गाईंना हे पिल्लू खूप क्यूट वाटले असेल. तर तिसऱ्याने लिहिले की, अरे पण हा कुत्रा आहे; पण गाईंनी अशा प्रकारे दुसऱ्या प्राण्याला चाटल्याचा हा पहिलाच व्हिडीओ नाही. यापूर्वी गाईने सापाला चाटल्याचा व्हिडीओ समोर आला होता.

Story img Loader