Viral Video: पावसाचे मुंबईत आगमन झाले असले तरीही उकाडा काही केल्या कमी होत नाही आहे. मान्सूनच्या आगमनाने सुखावलेलं वातावरण असले तरीही दुसऱ्या बाजूला लाही लाही करणारं तापमानसुद्धा लोकांना असह्य करून सोडतं आहे. उकाडा कमी करण्यासाठी अनेक जण एसी, कुलर आदींची मदत घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तीन अज्ञात पुरुष स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये झोपलेले दिसत आहेत. नक्की काय घडलं लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ पंजाबचा आहे. पंजाबमधील पतियाळा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एटीएममध्ये तीन अज्ञात पुरुष झोपलेले दिसत आहेत. तर गोष्ट अशी आहे की, आदल्या दिवशी रात्री मद्यपान केलेले तीन अज्ञात पुरुष एटीएम पाहून थांबतात. उकडा असल्यामुळे ते एटीएममध्ये विश्रांती घेण्याचे ठरवतात आणि रात्री तिथेच झोपून राहतात. सकाळी काही स्थानिक नागरिक एटीएममध्ये जातात, तेव्हा त्यांना तीन अज्ञात पुरुष एटीएममध्ये झोपलेले दिसतात. नक्की पुढे काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…‘५०० रुपये दंड…’ मोलकरीण, डिलिव्हरी बॉयसाठी लावली चक्क नोटीस; सोसायटीच्या लिफ्टचा उपयोग केला तर… पाहा पोस्ट

व्हिडीओ नक्की बघा…

आपण अनेकदा मित्र-मैत्रिणींबरोबर एटीएममध्ये पैसे काढायला जातो. एसीच्या थंडगार हवेचा आनंद घेण्यासाठी आपणसुद्धा मित्र-मैत्रिणींबरोबर आत एटीएममध्ये जातो आणि गारगार हवेचा आनंद घेतो. पण, व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मद्यपान केलेले तीन अज्ञात पुरुष रात्री एटीएममध्ये जातात आणि एसीच्या थंडगार हवेचा आनंद घेतात आणि सकाळी काही नागरिक येतात तेव्हा हे दृश्य पाहतात आणि याचा व्हिडीओ शूट करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. हा व्हिडीओ मजेशीर असला तरीही नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अयोग्य आहे; जो अनेकांना विचार करायला भाग पाडत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ गगनदीप सिंग यांच्या एक्स (ट्विटर) @Gagan4344 अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘बँक एटीएमच्या एसीने लोकांना आश्रय दिला’; अशी कॅप्शन त्याला देण्यात आली आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून स्टेट बँँक ऑफ इंंडियाने ‘तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमा मागतो, कृपया एटीएम आयडी/सीडीएम आयडी किंवा एटीएमचे अचूक स्थान आणि ते एटीएम/सीडीएम शोधण्यासाठी जवळच्या शाखेचा कोड/नाव आमच्याबरोबर शेअर करा, जेणेकरून आमची संबंधित टीम या समस्येची योग्य दखल घेऊ शकेल’, अशी उपहासात्मक कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three drunken men seen sleeping on the floor of the atm viral video prompts response from bank watch ones asp
Show comments